चीनकडील २४५ रुपये किंमतीचे टेस्टिंग किट ६०० रुपयाला ऑर्डर करणे हा प्रचंड मोठा भ्रष्टाचार


देशभरात कोरोनाच थैमान सुरूच आहे. देशात रोज कोरोना संक्रमित रुग्णांची संख्या वाढतच आहे. जागतिक आरोग्य संघटनेने अधिकाधिक टेस्ट करणे हाच सर्वात चांगला उपाय असल्याचं सांगितलं आहे.


याच अनुशंघाने भारताने चीनकडून कोरोना साठी टेस्टिंग किट्स विकसत घेतल्या होत्या. त्यांची प्रत्यक्ष वापराला सुरुवात केली असता त्यात अनेक त्रुटी समोर आल्याने या किट्स बोगस असल्याचं राज्यांच्या आरोग्य विभागांकडून सांगण्यात आलं आहे.


आता देशातील सर्वात मोठा विरोधी पक्ष असलेल्या कॉंग्रेसने सत्ताधारी भाजपकडून किट्सच्या खरेदीत भ्रष्ट्राचार झाला असल्याचं म्हटलं आहे. कॉंग्रेसच्या अधिकृत ट्वीटर हॅन्डेलवर याबाबत पोस्ट टाकण्यात आली आहे. यात म्हटलंय’


चीनकडील २४५ रुपये किंमतीचे टेस्टिंग किट ६०० रुपयाला ऑर्डर करणे हा प्रचंड भ्रष्टाचार उघडकीस आणत आहे. या भ्रष्टाचारात कुणाची जबाबदारी किंवा उत्तरदायित्व भाजप सरकार ठरवेल?