ओळख UPSC पूर्व परीक्षेची...


देशातील लॉकडाऊनची स्थिती सामान्य झाली तर पूर्वनियोजित वेळेनुसार यूपीएससी पूर्व परीक्षा ३१ मे रोजी होणार आहे. या परीक्षेला ज्या उमेदवारांनी अर्ज भरले आहेत, त्यांची आता अखेरच्या टप्प्यातली तयारी सुरू असेल. अजून परीक्षेला जवळपास दोन महिन्यांचा अवधी आहे. पूर्व परीक्षेचा पॅटर्न आम्ही तुमच्यासाठी येथे देत आहोत...


पाहूया कसा असतो पूर्व परीक्षेचा पॅटर्न
यूपीएससी सिव्हील सर्व्हिसेस मार्किंग स्कीम -
१) सर्वसाधारण अभ्यासाचे सर्व प्रश्न २ गुणांचे असतात.


२) सीसॅट म्हणजेच सिव्हील सर्व्हिस अॅप्टिट्युड टेस्ट पेपरचे सर्व प्रश्न २.५ गुणांचे असतात.


३) प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी एक तृतीयांश गुण वजा होतात.


४) उत्तराचे एकापेक्षा अधिक पर्याय निवडले तर त्यापैकी एक बरोबर जरी असलं तरी ते उत्तर चुकीचं मानण्यात येईल.


५) उत्तरांचे पर्याय भरले नाहीत तर गुण वजा होत नाहीत.


६) पात्र होण्यास ३३ टक्के गुणांची आवश्यकता असते.


सिव्हील सर्व्हिसेस प्रीलिम्स सिलॅबस


परीक्षेत दोन पेपर असतात. पहिला पेपर सिव्हिल सर्व्हिस अॅप्टिट्यूड टेस्ट (सीसॅट) आणि दुसरा पेपर जनरल अॅबिलिटी टेस्ट (जीएटी) चा असतो.


जनरल अॅबिलिटी


या पेपरमध्ये देशासंदर्भातील विविध प्रकारच्या ज्ञानाचे परीक्षण होते. इतिहास, भूगोल, अर्थशास्त्र आदि विविध विषयांवर प्रश्न विचारले जातात. राष्ट्रहिताच्या घटना, देशाची भौगोलिक स्थिती, घटनात्मक चौकट, आर्थिक सामाजिक विकास, वैज्ञानिक विकास अशा विविध क्षेत्रांतील प्रश्न विचारले जातात.


सीसॅट (इंग्लिश आणि जनरल अॅप्टिट्यूड)


कॉम्प्रिहेंशन, कम्युनिकेशन स्कील्स, लॉजिकल रिझनिंग आणि अॅनालिटिकल अॅबिलिटी, प्रॉब्लेम सॉल्व्हिंग, मेंटल अॅबिलिटी, गणित (१० वीपर्यंतच्या स्तराचे) , इंग्रजी कॉम्प्रिहेंशन स्कील्स (१० वीपर्यंतच्या स्तराचे)


पेपर पॅटर्न


परीक्षा पद्धती - ऑफलाइन
पेपरची संख्या - २
प्रश्न - पहिल्या पेपरमध्ये ८०, दुसऱ्या पेपरमध्ये १००
एकूण गुण - ४००
परीक्षेची भाषा - हिंदी आणि इंग्रजी


मागील वर्षीचे पेपर


मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिकांचा सराव कराल तर तुम्हाला प्रश्नांचा पॅटर्नही लक्षात येईल आणि पेपर वेळेत सोडवण्याच्या दिशेनेही तुम्ही प्रयत्न कराल. शिवाय तुमची प्रॅक्टीसही होईल. अनेकदा जुने प्रश्न पुन्हा विचारले जातात. www.upsc.gov.in  २०१९ मधील यूपीएससी सिव्हिल सेवा पूर्व परीक्षेच्या प्रश्नप्रत्रिका येथे दिल्या आहेत. या वेबसाईटवर जाऊन तुम्ही त्या डाऊनलोडदेखील करू शकता.


***