जयंती विशेष :
14 एप्रिल 2020
______________________
स्ञी मुक्तीचा दाता : डॉ.बाबासाहेब आंबेडकर
______________________
लेखक-अजय मगर हिंगोली
प्रदेश महासचिव युवक आघाडी
सावता सेना महाराष्ट्र राज्य
जेंव्हा सर्वत्र जातीय व्यवस्थेचा वर्णव्यवस्थेचा व उच - नीचतेचा कहर माजला होता माणसा सारख्या माणसाला अतिशय हीन दर्जाची वागणूक दिली जात होती.मानसा सारख्या माणसाला सार्वजनिक ठिकाणी पाणी पिण्यास बंदी होती , वर्गात बसण्याची बंदी होती , एवढ नव्हे तर माणसाची सावली देखील अपवित्र मानली जात होती.
त्यावेळेच या भूतलावर असा सूर्य जन्मास आला की त्याचा प्रकाश मानव जाती प्रमाणेच सर्व सजीवावर पडला अशाच महामानव विश्वरत्न, परमपूज्य,बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी यांनी महिला हा सर्व जगाचा आणि जीवनाचा केंद्रबिदू मानला आहे. त्याच्या सामाजिक, धार्मिक आणि ईतर लढाई मध्ये त्यानी स्त्रीयांना महत्त्वाचे स्थान दिले. उचवर्णीय महिला पासून गोरगरीब व पुरुष जातीच्या पिंजऱ्यातुन मुक्त करण्यासाठी अहोरात्र काम केले. कामगार स्त्रियांना समान वेतन तिच्या कामाचे ठराविक तास सुरक्षित ठिकाण आणि मुख्य म्हणजे तिच्या लहान मुलांसाठी पाळणाघरे तसेच तिला बाळंतपणाच्या सुट्या तिच्या आरोग्यासाठी आणि शिक्षणासाठी विशेष करून संपत्ती वाटा हे एवढे उपकार संविधानाच्या रूपात लिखित स्वरूपात दिले नाहीतर सती सारख्या भयानक प्रथा आमच्या भारतात होत्या हे विसरता कामा नाही माझ्या माता बहिणींनो हिंदुकोड पास होत नसल्याने कायदे मंत्री पदाच राजीनामा क्षणाचा विचार न करता दिला हे काय फक्त दलितांसाठी आहे का? विचार करा जर डॉ. बाबासाहेब आंबेडकर नसते तर पुरुषसत्ताक मिरवणाऱ्या नी तुमचे काय हाल केले असते!हे विचार करूनच अंगाला काटा उभा राहिला असता. प्रसूतीनंतर तीन महिने काहि राज्यात सहा महिने शासकीय कर्मचारी असो की कामगार असो त्याना पगारी सुट्टी दिली जाते मजूरमंत्री असताना तुमच्या साठी केलेले महान कार्य आहे. तरीपण आज बहुजन समाजातील शिकलेले आणि उकलेले स्त्री पुरुष तसेच प्रस्थापित समाजातील लोक डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना दलितांचेच पुढारी म्हणून तोंड वर करून सांगतात वास्तविक विचार लोकांना सांगा.महिलांनो फक्त नोकरी लागून संसार करून जीवन जगणे महत्त्वाचे नाही तर आपण कोठे होतो.आणि आताच आपले अस्तित्व कोणी निर्माण केल हे विसरून चालणार नाही. शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे जो पेइल तो गुर गुरल्या शिवाय राहणार नाही हे बाबासाहेबांचच वाक्य होतं.यामधून बाबासाहेबांना सांगायचं होत की जिवंत पणी मेलेल्या माणसाला जिवंत असल्याचा भास करुन देण्यासाठी शिक्षण घेणे गरजेचे आहे.स्वाभिमानाने जगण्यासाठी शिक्षण घ्या.स्वतः च्या हक्क अधिकाराची जाणीव होण्यासाठी शिक्षण घ्या.आपल्या गुलामीचे , अस्पृश्यतेचे , मागासले पणाचे , अज्ञानाचे कारण शोधून त्या विरुद्ध लढा उभा करणे म्हणजे गुर गुरने असा त्या वाक्याचा अर्थ होतो..
शिव,फुले,शाहू,आंबेडकर यांचे विचार आत्मसात करा!
आपण बाबासाहेबांबद्दल बोलताना अतिशय भावनिक होऊन म्हणतो की बाबासाहेबांनी वर्गाच्या बाहेर बसून शिक्षण घेतल तसेच 2 वर्ष 11 महिने 18 दिवस रात्रंदिवस जागून संविधान लिहिलं.परंतु ही गोष्ट आमच्या लक्षात का येत नाही की हे संविधान बाबासाहेबांनी स्वतः साठी लिहिलं नसून तुम्हा आम्हा सर्वांसाठी लिहिले आहे..मग बाबासाहेबांनी आपल्या साठी काय काय लिहिले आहे हे वाचण्याचे कर्तव्य कोणाचे आहे..या बद्दल आपण का विचार करत नाहीत.एवढेच नव्हे तर बाबासाहेबांनी अनेक प्रकारचे साहित्य लिहिले आहेत ते पण बाबासाहेबांनी स्वतः साठी लिहिले नाहीत आपल्या सर्वांसाठीच लिहिलेले आहेत.मग ते वाचण्याची जिम्मेदारी कोणाची आहे.
नक्कीच आपली आहे तर मग या वर्षी आपल्याला जयंती निमित्त घराच्या बाहेर येता येणार नाही त्यामूळे बाबासाहेबांनी लिहिलेल्या पुस्तकांपैकी एक तरी पुस्तक वाचून पूर्ण करायचे हिच खरी बाबासाहेबांना अभिवादन ..आणी हेच बाबासाहेबांना अपेक्षित आहे.
***