गुगलमध्ये काम करण्याचा अनुभव मिळवण्याची नामी संधी चालून आली आहे. गुगलने पीएचडी फेलोशीप प्रोग्राम २०२० साठी अर्ज मागवले आहेत. भारतीय विद्यार्थ्यांना चार वर्षांपर्यंत फेलोशीप मिळणार आहे. सुमारे ३८ लाख रुपयांचा स्टायपेंड मिळेल. यात प्रवास व अन्य खर्चाचा समावेश असेल. याव्यतिरिक्त गुगलचा रिसर्च मेंटॉर मिळणार आहे.
गुगलमध्ये काम करण्याचा अनुभव मिळवण्याची नामी संधी चालून आली आहे. गुगलने पीएचडी फेलोशीप प्रोग्राम २०२० साठी अर्ज मागवले आहेत. पुढे दिलेल्या क्षेत्रात काम करण्यास इच्छुक उमेदवार या पीएचडी फेलोशीप प्रोग्राम २०२० साठी अर्ज करू शकतात. ही क्षेत्रे आहेत – अल्गोरिदम्स, ऑप्टिमायझेशन्स अँड मार्केट्स, कॉम्प्युटेशनल न्यूरोसायन्स, ह्युमन कॉम्प्युटर इंटरॅक्शन, मशीन लर्निंग, मशीन पर्सेप्शन, स्पीच टेक्नॉलॉजी अँड कॉम्प्युटर व्हिजन, मोबाइल कॉम्प्युटिंग, नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग, प्रायव्हसी अँड सिक्युरिटी, प्रोग्रामिंग लँग्वेज अँड सॉफ्टवेअर इंजिनीअरिंग, क्वॉन्टम कॉम्प्युटिंग, स्ट्रक्चर्ड डेटा अँड डेटाबेस मॅनेजमेंट आणि सिस्टीम्स अँड नेटवर्किंग्ज.
पात्रता
या फेलोशीपसाठी कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थेतून पीएचडी करत असलेले विद्यार्थी अर्ज करू शकतात. पदवी किंवा पदव्युत्तर पदवी करणारे विद्यार्थी देखील अर्ज करू शकतात. जर विद्यार्थ्याला कुठली अन्य स्कॉलरशीप मिळत असले तर ते विद्यार्थी मात्र अर्ज करू शकणार नाहीत. फेलोशीपच्या कालावधीपर्यंत विद्यार्थ्याचा पीएचडी प्रोग्राम जारी रहायला हवा, अन्यथा फेलोशीप रद्द करण्यात येईल.
फायदे कोणते?
भारतीय विद्यार्थ्यांना चार वर्षांपर्यंत फेलोशीप मिळणार आहे. सुमारे ३८ लाख रुपयांचा स्टायपेंड मिळेल. यात प्रवास व अन्य खर्चाचा समावेश असेल. याव्यतिरिक्त गुगलचा रिसर्च मेंटॉर मिळणार आहे.
कधीपर्यंत करता येईल अर्ज?
या फेलोशीपसाठी २७ एप्रिल २०२० पर्यंत अर्ज करता येणार आहे.