करोनाविरोधात लढण्यासाठी बॉलिवूड कलाकारांनी केली लाखमोलाची मदत....
सध्या करोना विषाणूच्या वाढत्या संक्रमणात देशवासियांची मदत करण्यासाठी बॉलिवूड कलाकारांनी I FOR INDIA नामक एका खास कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात आमिताभ बच्चन, अक्षय कुमार, प्रियांका चोप्रा, शाहरुख खान, आमिर खान यांसारख्या अनेक नामांकित कलाकारांनी भाग घेतला होता. वर्चुअली सादर करण्यात आलेल्या या कार्यक्रमाने तब्बल ५२ कोटी रुपयांचा फंड गोळा केला आहे.
फेसबुकच्या माध्यमातून या कार्यक्रमाचे ब्रॉडकास्ट करण्यात आले होते. या कार्यक्रमात काही कलाकारांनी गाणी गायली, कथा-कविता वाचून दाखवल्या, काही जणांनी स्टँड अप कॉमेडी केली, तर काही जणांनी विविध प्रकारची वाद्ये वाजवून प्रेक्षकांचे मनोरंजन केले. द विकने दिलेल्या वृत्तानुसार जवळपास चार कोटी ३० लाख प्रेक्षकांनी या कार्यक्रमाचा आनंद घेतला. या ऑनलाईन कार्यक्रमाच्या माध्यमातून बॉलिवूड कलाकारांनी जवळपास ५२ कोटी रुपयांचा मदत निधी उभारला. हे सर्व पैसे त्यांनी पंतप्रधान सहाय्यता निधीसाठी सरकारकडे सुपूर्त करण्यात आले आहेत.
***