हिंगोली : खरीप हंगामाकरीता येथील जिल्हाधिकारी कार्यालयात आज जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांच्या हस्ते शेतकऱ्यांना बांधावर खत वितरण करण्यात आले. जिल्हाधिकारी यांच्या हस्ते हिंगोली तालूक्यातील गणेशवाडी येथील छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी गटाला 05 टन रासायनिक खताचे वितरण करण्यात आले.
यावेळी जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी विजय लोखंडे यांच्यासह शेतकरी बांधवांची उपस्थिती होती.
****