हिंगोली जिल्ह्यासाठी एकुण ३४.३२ कोटी अतिरिक्त निधी मंजूर
औंढा नागनाथ आणि सिध्देश्वर पर्यटन स्थळांचा विकासाकरीता ११ कोटी मंजूर
हिंगोली जिल्ह्यासाठी औरंगाबाद : हिंगोली जिल्ह्यातील विकासासाठी जिल्हा वार्षिक योजना २०२० -२१ या अर्थिक वर्षाकरीता सर्वसाधारण वार्षिक योजनेतंर्गत प्रत्यक्ष १०१ कोटी ६८ लाख रुपयांचा प्रारुप आराखडा तयार करण्यात आला होता. या आराखड्यास जिल्हा नियोजन समिती मंजूरी दिलेली आहे. औरंगाबाद येथे आयोजित राज्यस्तरीय प्रारुप आराखडा बैठकीत जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी १५७ कोटी २३ लाख रुपयांची अतिरिक्त मागणी केली होती. त्यापैकी सर्वसाधारण वार्षिक योजनेतंर्गत २३.३२ कोटी अतिरिक्त निधी वाढवून दिल्याने ०८ फेब्रुवारी जिल्ह्यासाठी आता जिल्ह्याचा सर्वसाधारण वार्षिक योजनेचा आराखडा १२५ कोटी रुपयांचा झाला. तर पर्यटन विकासाकरीता ११ कोटी निधी वित्त व नियोनज मंत्री अजित पवार यांनी मंजूर केला. येथील विभागीय आयुक्त कार्यालयातील सभागृहात वित्त व नियोजन मंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षेत आयोजित राज्यस्तरीय प्रारुप आराखडा बैठक संपन्न झाली. या बैठकीस जिल्हा परिषद अध्यक्ष गणाजी बेले, सर्वश्री आमदार तान्हाजी मुटकूळे, राजू नवघरे, अपर मुख्य सचिव देबाशीष चक्रवर्ती, विभागीय आयुक्त सुनिल केंद्रेकर जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, मुख्य कार्यकारी अधिकारी एच.पी. तुम्मोड यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी यांनी जिल्हा नियोजन समितीमध्ये मंजर झालेल्या जिल्हा वार्षिक योजनेच्या प्रारुप आराखड्याची सविस्तर माहिती सादर केली. तसेच विविध विकास कामासाठी लागणाऱ्या अतिरिक्त निधीबाबतचे सादरीकरण केले. यावेळी आमदार राजु नवघरे आणि तान्हाजी मटकळे यांनी जिल्ह्यातील विविध विकास कामाकरीता करण्यात आलेली अतिरिक्त मागणी मंजूर करुन हिंगोली जिल्ह्यास निधी उपलब्ध करुन देण्याची मागणी केली. तसेच जिल्ह्यात हळद आणि सोयाबीनवर अधारित प्रक्रीया उद्योगाकरीत वाव असन त्याकरीता निधीची मागणी केली. यावर वित्त व नियोनज मंत्री अजित पवार यांनी याबाबतचा सविस्तर प्रस्ताव निधी मंजूर सादर करा. विशेष बाब म्हणुन याकरीता निधी देण्यात येईल असे | सांगितले. तसेच बैठकीत वित्त व नियोनज मंत्री अजित पवार यांनी तसेच ओढा नागनाथ आणि सिध्देश्वर पर्यटन स्थळांचा विकास करण्यासाठी विभागीय आयुक्त यांच्या सुचनेनुसार प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश दिले. याकरीता विशेष बाब म्हणुन ११ कोटी निधी देण्यात येईल, परंतु ही विकास कामे दर्जेदार व उत्कृष्ट करा अशा सूचना श्री. पवार यांनी यावेळी दिल्या. यावेळी हिंगोली जिल्ह्यातील विविध विभागाच्या विभाग प्रमुखांची उपस्थिती होती.