इस्लामाबाद : जगातील 192 देशांमध्ये कोरोना व्हायरस पसरला आहे. पाकिस्तानमध्ये आतापर्यंत 803 प्रकरणे समोर आली आहेत आणि 6 जणांचा मृत्यू झाला आहे. पंतप्रधान इम्रान खान देशाला पूर्णपणे लॉकडाउन करण्यासाठी तयार नाही. त्यांच्यानुसार, असे करणे शक्य नाही, कारण देशातील एक तृतीयांश म्हणजेच 25% लोकसंख्या दारिद्र्य रेषेखाली जगते.
पंतप्रधान कार्यालयाने ट्वीट केले, ‘‘पूर्णपणे लॉकडाउनचा अर्थब आहे - आर्मी आणि प्रशासनाद्वारे कर्फ्यू लागू केला जाणे. निश्चितच यामध्ये लोकांना घरात राहण्याची सक्ती केली जाते. देशातील 25% लोकसंख्या रोज कमावून खाणारी आहे. ही वास्तविकता लक्षात घेऊन आम्ही सावधगिरीची पावले उचलत आहोत. आम्हाला वयस्कर आणि इतर लोकांची काळजी आहे. सुरक्षेसाठी सामाजिक स्वरूपात अंतर ठेवणे, स्वतःला आयसोलेशन आणि क्वारंटाईनमध्ये ठेवणे गरजेचे आहे.’’
इम्रान यांनी हादेखील सल्ला दिला की, 'घाबरू नये, कारण यामुळे लोकांमध्ये घबराट वाढेल. धान्य जमा केल्यामुळे अन्नाची कमतरता भासेल. याचे परिणाम फार वाईट होतील. या संकटाशी लढण्याचा आम्ही पूर्ण प्रयत्न करत आहोत. भीती रोखण्यासाठी मीडियाची भूमिकाही महत्वाची असेल. बहिरी आजारापेक्षा जास्त भयावह ठरेल. आपल्या जबाबदाऱ्या पार पद आणि अवधगिरी बाळगून स्वतःला आणि इतरांना सुरक्षित ठेवा.'