व्हॅक्सिनसाठी शर्यत / जगात 41 प्रकारच्या लसींची क्लिनिकल ट्रायल सुरू

वॉशिंग्टन-बीजिंग : काेरोनाचे उच्चाटन करण्यासाठी जगभरात ४१ प्रकारच्या लसींची चाचणी केली जात आहे. चीनमध्ये अकॅडमी ऑफ मिलिट्री मेडिकल सर्व्हिस व चायनिज सायन्स अकॅडमीच्या १ हजाराहून जास्त संशोधक त्यावर काम करत आहेत. जर्मनीची क्यूरवॅक व्हॅक्सिन त्याच्या निर्मितीसाठी प्रयत्नशील आहे. फ्रान्सची सनोफी पस्तयूर जॉन्सन अँड जॉन्सन व एली लिलिसोबत संयुक्त प्रयत्न करत आहे. रशियाने सायबेरियाच्या प्रयोगशाळेत लसीच्या प्रोटोटाइपचे ट्रायल जानेवारीपासून सुरू केले आहेत. अमेरिकेच्या सिएटल व वॉशिंग्टनमध्ये ४ रुग्णांवर लसीवरील परीक्षण सुरू आहे.


या लसीला एमआरएनए-१२७३ असे नाव देण्यात आले आहे. ही लस विषाणूची कॉपी करून जेनेटिक कोडमधील सूक्ष्म तुकड्यापासून तयार करण्यात आली आहे. तज्ञांच्या म्हणण्यानुसार सामान्यपणे लस तयार करण्यासाठी १० ते १५ वर्षे लागतात. परंतु कोरोनाची लस १ ते दीड वर्षात बनणे शक्य आहे. बर्मिंगहम विद्यापीठात विषाणूसंसर्ग संबंधित आजाराचे तज्ञ प्रोफेसर रॉबर्ट म्हणाले, लसीची चाचणी सुरू आहे. तिचा वेग खूप जास्त आहे. आगामी काही आठवड्यात आमच्याकडे ठोस माहिती असेल. आरएनएचा वापर आम्ही मानवी शरीरातील विषाणूच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. एखाद्याला केक एेवजी केक तयार करण्याची रेसिपी देण्यासारखा हा प्रकार आहे. ही लस जास्त कालावधीसाठी शरीरात राहते. हा कोड खूप वेगाने काम करतो. त्यामुळे साईड इफेक्ट म्हणून ताप येऊ शकतो. परंतु त्यावर सोपा उपचार आहे.


दुसरीकडे जागतिक आरोग्य संघटनेच्या ताज्या अहवालानुसार अनेक महत्वाची माहिती अद्याप मिळालेली नाही. म्हणूनच लसीचे परीक्षण सुरू आहे. अजूनही परीक्षण प्री-क्लिनिकल पातळीवर आहे. म्हणजेच परीक्षण प्राण्यांवर केले जात आहे. जोपर्यंत हे परीक्षण ठोस पातळीवर होत नाही. तोपर्यंत खात्रीने काही सांगता येणार नाही. लसीचा माणसाच्या रोगप्रतिकार शक्तीवर काय परिणाम होतो, याचेही मूल्यांकन अद्याप व्हायचे आहे.