ज्येष्ठ नागरिकांना करोना व्हायरसचा सर्वाधिक धोका आहे. ६० वर्षांहून अधिक वय असलेल्या नागरिकांची अधिक काळजी घेण्याच्या सूचना दिल्या जातात. फुफ्फुसांचे आजार, हृदयविकार, मधुमेह या सारखे आजार असलेल्या नागरिकांना तुलनेने अधिक लवकर संसर्ग होतो. घरातील जेष्ठांची काळजी घेत असताना काही गोष्टी लक्षात घेणं अधिक गरजेचं आहे. सगळ्यात पहिल्यांदा सोशल डिस्टन्सिंगचा अवलंब करा .तसंच, त्यांच्या मानसिक आरोग्यावर परिणाम होणार नाही याची काळजी घ्या. वॉकर, काठ्या हँडरेल्स, त्यांनी वापरलेली वैद्यकीय उपरणं वारंवार स्वच्छ करा. जेष्ठांना गुंतवून ठेवण्यासाठी किंवा त्यांचं मन रमवण्यासाठी टि.व्ही पाहणं, पुस्तक वाचणं यासारख्या पर्यायांचा उपयोग करता येईल. वेळ घालवण्यासाठी तंत्रज्ञानाचा उपयोग करून घ्यायला शिकवाजेणेकरून ते आपले मित्र आणि कुटुंबीयांच्या संपर्कात राहू शकतील.जेष्ठांना जेवायला देण्याआधी, स्वच्छतागृहांचा वापर करण्याआधी २० सेकंद साबण व पाण्याने हात धुण्यास सांगापुढील चार आठवड्यांची औषधं घरात आणून ठेवा.
***