हिंगोली : बळसोंड भागामध्ये स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास प्रविण नगरातील नरेंद्र बळीेराम खंदारे याच्या घरात अवैध गुटखा असल्याची माहिती मिळाल्याने छापा मारला असता त्याठिकाणी विमल पान मसाला, व्ही - १, सुगंधीत तंबाखु गुटखा १ लाख ४० हजार ६७० रुपयाचा मिळून आला. सदरिल गुटखा मोहमद खान दौलतखान पठाण रा. मंगळवारा बाजार याचा असल्याचे चौकशी दरम्यान निष्पन्न झाल्याने दोघाविरूद्ध कारवाई करण्याकरीता पोलिस उपनिरीक्षक शिवसांब घेवारे हे हिंगोली ग्रामीण ठाण्यात रवाना झाले होते. तसेच तलाबकट्टा भागात गुन्हे शाखेने जुगारावर छापा मारला. याठिकाणी श्रावण लक्ष्मीनारायण कुरील, गणेश लक्ष्मीनारायण कुरील, शंकर बालाराम गांधी, इश्वरलाल लक्ष्मन कुरील, दिपक प्रल्हाद वाठोरे, शेख अखील शेख मिया, सय्यद मुख्तार सय्यद चाँद सर्व रा. हिंगोली व इतर पळून गेलेले पाच अशा १२ जणांवर हिंगोली शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. या कारवाईत नगदी ४२१९, ५ मोबाईल असा एकुण ४३ हजार ७१० रुपयाचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई पोलिस अधिक्षक योगेशकुमार, अप्पर पोलिस अधिक्षक यशवंत काळे, पोलिस निरीक्षक जगदीश भंडरवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक शिवसांब घेवारे, किशोर पोटे, बालाजी बोके, संभाजी लकुळे, सुनील अंभोरे, राजुसिंग ठाकुर, विशाल घोळवे, शंकर ठोंबरे, किशोर सावंत, दिपक पाटील, आकाश टापरे यांच्या पथकाने कारवाई केली.
***