‘कोरोना’विरुद्धच्या युद्धासाठी हातात अवघ्या 22 दिवसांचं बाळ घेऊन ‘या’ महापालिकेच्या आयुक्त मैदानात


मुंबई : देशभरात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. तर राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या सतत वाढत आहे. या पार्श्वभूमीवर सरकारकडून सर्वोत्तोपरी मेहनत घेतली जात आहे. देशभरातील सरकारी यंत्रणा कामाला लागली आहे. वैद्यकीय कर्मचारी, डॉक्टर, पोलीस रात्रंदिवस मेहनत घेत आहेत.


तसेच याच पार्श्वभूमीवर महापालिका अधिकाऱ्यांची कामही वाढली आहेत. याचप्रमाणे विशाखापट्टणम महानगरपालिकेच्या (GVMC) आयुक्त जी. श्रीजना यांनी मुलाला जन्म दिल्यानंतर अवघ्या 22 दिवसातच कामावर पुन्हा रूजू झाल्या आहेत.


श्रीजना यांची डिलिव्हरी झाल्यानंतर थोड्या दिवसातच लॉकडाऊन जाहीर करण्यात आला. आयुक्तांची जबाबदारी या परिस्थितीत महत्त्वाची असताना, श्रीजना यांनी कोणतीही तक्रार न करता 22 दिवसांच्या आतच ऑफिस गाठले.


***