कोरोना महाराष्ट्र : उद्धव ठाकरे - लॉकडाऊन 30 एप्रिलपर्यंत राहणार


मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींबरोबर झालेल्या बैठकीनंतर राज्यातल्या जनतेला संबोधित केलं.


महाराष्ट्रात किमान 30 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन कायम राहिल, असं त्यांनी जाहीर केलं.


त्यांनी मांडलेले मुद्दे -



  • राज्यात संचारबंदीपासून सुरुवात करण्यात आली आणि आता आपण लॉकडाऊनपर्यंत आलो आहोत. मुंबईत जिथं जिथं कोरोनाचे रुग्ण सापडले, ते भाग पूर्णत: सील केले आहेत.

  • कोरोनाचे रुग्ण कुणाच्या संपर्कात आले, याची नोंद ठेवण्याचं काम राज्यातील महापालिका करत आहेत.

  • राज्यात 33 हजार कोरोनाच्या चाचण्या झाल्यात. यात मुंबईत 19 हजार चाचण्या झाल्या. यापैकी 1 हजार जणांना कोरोनाची लागण झालीय.

  • या सोमवारी राज्यातील पहिला रुग्ण आढळून 5 आठवडे पूर्ण होतील. यापुढे एकसुद्धा रुग्ण वाढता कामा नये. कोरोनाचा संसर्गातून निर्माण झालेली साखळी आपण तोडत आहोत.

  • 14 एप्रिलनंतर महाराष्ट्रात लॉकडाऊन कायम ठेवणार. शेतीच्या कामाला लॉकडाऊनमध्ये परवानगी आहे. ती तशीच चालू राहिल. तसंच जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरू राहणार.

  • 14 एप्रिलपासून 30 एप्रिलपर्यंत महाराष्ट्रात लॉकडाऊन कायम राहिल.

  • किमान 30 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन राहिल, किमान शब्द मी काळजीपूर्वक वापरतोय. कारण 30 एप्रिलनंतर परिस्थिती कायम राहिल्यास काही ठिकाणी बंधनं अधिक कडक करावी लागतील.

  • लॉकडाऊन कधीपर्यंत चालेल हे आपल्या हातात आहे. शिस्त पाळली आणि संसर्गाची साखळी तोडली तर आपण त्यातून लवकर बाहेर पडू.

  • आपण शिस्त पाळली, तर भविष्यात आपला देश जागतिक महासत्ता बनू शकते. अमेरिका आताच आपल्याकडून औषध मागत आहे.


***