कोरोनाच्या काळात कोणत्याही शाळांनी विद्यार्थ्यांची शैक्षणिक फी मागू नये : वर्षा गायकवाड


मुंबई दि.17: राज्याच्या शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी आज आपल्या व्हिडीओच्या माध्यमातून राज्यातील सर्व शैक्षणिक संस्थाना आणि शाळांना कोरोनाच्या काळात विद्यार्थ्यांची शैक्षणिक फी न मागण्याचे आवाहन केले आहे.


कोरोनाच्या संकटात संपूर्ण राज्यात संचारबंदी आहे. त्यामुळे नागरिकांचे उद्योगधंदे बंद आहेत. अशा काळात सर्वांवरच आर्थिक संकट असल्याने पालकांकडील पैशाची उपलब्धता पाहता शैक्षणिक संस्थांनी व शाळांनी फी मागू नये, असे आवाहन वर्षा गायकवाड यांनी केली आहे.


जर अस होत असेल तर विद्यार्थी अथवा पालकांनी स्थानिक जिल्हा शिक्षण अधिकाऱ्याकडे तक्रार नोंदवावी. जिल्हा शिक्षण अधिकाऱ्यांनी शासनाकडून आलेल्या पत्रकानुसार यावर अमलबजावणी करावी, असे निर्देश वर्षा गायकवाड यांनी दिले.
***