गेले सलग तीन दिवस दररोज एका पोलिस कर्मचाऱ्याचा 'कोरोना'मुळे झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. महत्वाचं म्हणजे हे सर्व पोलिस कर्मचारी 50 वर्षे वयापेक्षा जास्त वयाचे होते (Mumbai CP Directions to Police Constables)
मुंबई : मुंबई पोलिस दलातील तिघा हवालदारांना ‘कोरोना’मुळे प्राण गमवावे लागल्यानंतर पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी अत्यंत तातडीची पावलं टाकली आहेत. 55 वर्षापेक्षा जास्त वय असलेल्या पोलिस खात्यातील ज्येष्ठ कर्मचाऱ्यांना घरीच थांबण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. (Mumbai CP Directions to Police Constables)
ज्यांचं वय 55 वर्षापेक्षा जास्त आहे, त्यांनी बंदोबस्तामध्ये सहभागी होऊ नये, अशा सूचना मुंबई पोलिस आयुक्तांनी दिल्या आहेत. कोरोना विषाणूच्या संसर्गाचं नियंत्रण करण्यासाठी दिवसरात्र परिश्रम करणाऱ्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांसह आता पोलिस कर्मचारीही कोरोनाचे बळी ठरत आहेत.
गेले सलग तीन दिवस दररोज एका पोलिस कर्मचाऱ्याचा ‘कोरोना’मुळे झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. सर्वात महत्वाचं म्हणजे हे सर्व पोलिस कर्मचारी 50 वर्षे वयापेक्षा जास्त वयाचे होते. 55 वर्षापेक्षा अधिक वयाच्या पोलिस कर्मचाऱ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने पोलिस आयुक्तांनी हा महत्वाचा निर्णय घेतला आहे.
गेल्या तीन दिवसात मुंबई पोलिस दलातील तीन पोलिसांचा बळी गेला होता. कुर्ला ट्रॅफिक विभागात हवालदार म्हणून कार्यरत असलेल्या हवालदाराचा काल (27 एप्रिल) कोरोनामुळे मृत्यू झाल होता. याआधी 26 एप्रिलला 52 वर्षीय हवालदाराचं निधन झालं, तर 25 एप्रिलला 57 वर्षीय हवालदारालाही कोरोनामुळे प्राण गमवावे लागले होते. संबंधित कर्मचारी वाकोला पोलिस ठाण्यात कार्यरत होता, तर वरळीचा रहिवासी होता. (Mumbai CP Directions to Police Constables)
गृहमंत्री अनिल देशमुख यांनी यापूर्वी मृत्यू झालेल्या दोन्ही पोलिस कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 50 लाख रुपयांची आर्थिक मदत करण्याची घोषणा केली होती. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही एप्रिल महिन्याच्या सुरुवातीलाच ‘कोरोना’शी लढा देणाऱ्या महाराष्ट्र पोलिसांना 50 लाखांचे कवच मिळणार असल्याची घोषणा केली होती.
***