अडीच अक्षरांची तर असते पण शब्दांत व्यक्त करण्याइतकी सोपी गोष्ट नसते...
ओळख झाल्यावरच कळते की मैत्री या शब्दातच सर्वकाही दडलेले असते...
जो मनापासून करेल त्याला सर्व काही समजत असते...
कधी भांडण ,कधी रुसवे तर कधी फुगवे हे फक्त मैत्रीतच असते...
रक्ताचे नाते नसले तरी त्याहीपेक्षा अनमोल असते ते...
समजून घ्यायचे झाल्यास वेळच पुरत नसते...
म्हणून तर म्हणतात मैत्री ही मैत्रीच असते...
अन जो मनापासुन करेल त्याच्यासाठी ती एक कधीच न संपणारी साठवण असते...
- साक्षी सासवडे (पुणे)