सोशल एज्युकेशन मूव्हमेंट हिंगोली द्वारा डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त आयोजित स्पर्धा परीक्षेचे निकाल जाहिर...


हिंगोली : सोशल एज्युकेशन मूव्हमेंट हिंगोली द्वारा डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त स्पर्धा परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. सदर परीक्षा ही घरी बसूनच ऑनलाईन व्हॉटस्अॅपद्वारे घेण्यात आली असून स्पर्धेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला आहे. सदर स्पर्धा परीक्षा डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती दिनी १४ एप्रिल रोजी घेण्यात आली. परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला असून विजेत्या स्पर्धकांची नावे पुढील प्रमाणे आहेत. यामध्ये प्रथम जागृती सुभाष कांबळे, ब्दितीय मेघा चंद्रकांत भगत, तृतीय विभागून शिल्पा पांडुरंग बनसोडे व बौध्दरल बलखंडे, चतुर्थ मुजाहिद काशीम खान पठाण, पाचवा देवनील लक्ष्मण पुंडगे, सहावा सरिता सुरेश वाढे, सातवा कपिल पी. ठोके, आठवा (विभागून) दीपक सोपान मोरे व गौतम उमाकांत साळवे, नववा तेजस दिलीप धामणे, दहावा (विभागून) सम्यक सोनवणे, अनिता साहेबराव सिरसाठ, रत्नमाला भीमराव नरवाडे, प्रेरणा बापूराव घोडगे, अकरावा (विभागून) विश्वरत्न सोनटक्के, डॉ. अतिष कदम. बारावा अक्षय अनिल भगत, तेरावा (विभागून) मंजुश्री श्याम नरवाडे, सुप्रिया दामोदर दापके, चौदावा प्रतीक्षा संजय डोंगरे तसेच उत्तेजनार्थ बक्षीस प्रेरणा उत्तमराव बलखंडे हिने पटकाविले आहे. ऑनलाईन स्पर्धा परीक्षेच्या यशस्वीतेसाठी स्पर्धा परीक्षा मंडळाचे पी. यु. बनसोडे, बी. सी. कांबळे, टी. एम. पोघे, एम. एन. भालेराव, डी. एन. कंधारे, वाय. बी. चाटसे, जी. एस. मनयर, व्ही. आर. घोडके, एस. टी. ठोके, आर. एच. कळंये, ए. के. कांबळे, आर. आर. नरवाडे, एस. पी. सदावर्ते, डी. एफ. धुळे, टी. एन. जावळे, एस. जी. गायकवाड, डी. एम. कांबळे, व्ही. सी. कांबळे, एल. बी. पाईकराव, बी. सी. दांडेकर, आर. टी. कांबळे , पी. डब्ल्यू. घोंगडे आदींनी परिश्रम घेतले.
***