अकोला महानगरपालिका क्षेत्रामध्ये असलेली वयोवृद्ध आणि दिव्यांग, एकाकी राहणा-या ज्येष्ठ नागरिकांना मदतीसाठी महानगरपालिका येथे नोडल अधिकारी यांची नियुक्ती.

अकोला 2 एप्रील 20 – कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण राज्यात लॉक डाऊन करण्यात आले आहे त्या अनुषंगाने अकोला महानगरपालिका क्षेत्रामध्ये असलेली वयोवृद्ध आणि दिव्यांग, एकाकी राहणा-या ज्‍येष्‍ठ नागरिकांना मदतीसाठी (सोशल सेल व कंट्रोल रूमच्‍या सहाय्याने स्‍वयंसेवी मार्फत पुरविण्‍यात येणारे भोजन अन्‍न धान्‍य व ईतर सेवा) महानगरपालिका येथे दिव्यांग कक्ष प्रमुख कु.नंदीनी बाजीराव दामोदर यांची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तरी शहरातील अशा गरजू नागरिकांनी मदतीसाठी व तक्रार नोंदविण्‍यासाठी कंट्रोल रूम टोल फ्री व हेल्‍पलाईन नंबर 18002335733/0724-2434412/0724-2423290/0724-2434414/0724-2430084, सोशल सेलचे 1) योगेश मारवाडी – 7709588222,  2) महेश राऊत – 7709043388 या नंबरवर संपर्क साधण्‍याचे आवाहन मनपा आयुक्‍त श्री संजय कापडणीस यांनी केले आहे