युपीत साधूंची हत्या ठाकरेंचा योगींना फोन.....


मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याशी फोनवर चर्चा करून उत्तर प्रदेशमधील बुलंदशहर येथे घडलेल्या दोन साधूंच्या अमानुष हत्येवरून चिंता व्यक्त केली.


ज्या प्रकारे राज्यात घडलेल्या पालघर घटनेत राज्य सरकारने कठोर कायदेशीर कारवाई केली, त्याचप्रकारे उत्तर प्रदेश सरकारही कारवाई करून दोषींना कडक शिक्षा करेल अशी अपेक्षा मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली.


या घटनांना धार्मिक रंग देऊ नये असे आवाहनही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलंय.


***