हाश्मी सय्यद असगर हुसेन
हिंगोली जिल्हाप्रतिनिधी रिपोर्ट :
हजरत निजामुद्दीन , नवी दिल्ली येथील तबलिक जमात " मरकज " विरुध्द खोट्या आधारहीन व बनावट बातम्या प्रसिध्द करुन दोन समाजामध्ये व्देष पसरवुन अराजकता निर्माण करुन सामाजिक व जातीय सलोखा संपविणारे न्युज चॅनेल ABP News , India TV , Republic TV , Aaj Tak , News State , Sudarshan News आणि Zee News या चैनलचे एकर व चीफ एडीटर यांच्यावर कायदेशीर कारवाई करुन गुन्हा दाखल करण्याची मागणी विराट राष्ट्रीय लोकमंच कॉन्सिल ची मागणी!
हिंगोली : विराट राष्ट्रीय लोकमंच कॉन्सिल चे संस्थापक अध्यक्ष शेख नाईम शेख लाल यांनी त्यांची बाजू मांडताना निवेदनात पुढील प्रमाणे माहिती दिली आहे. भारत देशातही केरळ राज्यामध्ये वुहान शहरातुन सुरुवात केली. कोरोना वायरस या रोगांची लागण 20 वर्षाची चायना येथे मेडीकलला शिकत असलेली पॉझीटीव्ह मुलगी 25 जानेवारी 2020 रोजी भारतात परतली आणि या रोगाने हळुहळु भारत देशात आपले पाय पसरण्यास सुरुवात केली. याचदरम्यान फेब्रुवारी 2020 मध्ये अमेरीकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रपचे भव्य कार्यक्रमही घेण्यात आले या कार्यक्रमात लाखो लोकांची उपस्थिती होती. या कार्यक्रमानंतरही आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय हवाई वाहतुक सुरुच होती त्याचप्रमाणे देशातील रेल्वेसेवा, खाजगी बससेवा, शासकीय बससेवा नियमीतपणे चालु होती. यामुळे विदेशातुन व देशातुन हजरत निजामुद्दीन “ मरकज " मध्ये येणारे अनुयायी नियमीतपणे येत होते. कोरोना वायरसबाबत भारत देशामध्ये पसरत असलेली साथ पाहुन WHO ने सरकारला भारत देशात कोरोना वायरस प्रादुर्भाव रोखण्यासाठी लेखी सुचीत केले, त्याबाबत भारत सरकार या वायरसच्या रोखण्याकरिता गंभिरतापुर्वक विचार करत आहे याची मरकजला कणकण लागता मरकजमधील विदेशातुन व देशातुन आलेल्या अनुयायींना पाठविण्यात सुरुवात करण्यात आली. त्याचवेळी मा. पंतप्रधान महोदयांनी दि. 22 . 03 . 2020 ला जनता कफ्र्यु घोषीत केले व त्यानंतर दि. 24 . 03 . 2020 रोजी संपुर्ण देशभरात 21 दिवसाच्या लॉकडाऊनची घोषणा करुन कलम 144 अन्वये संचारबंदी लागु केली आणि असेही घोषीत केले की, जे लोक ज्या ठिकाणी आहेत त्याच ठिकाणी राहावे असे आदेशीत केले. त्यानंतरही हजरत निजामुद्दीन “ मरकज येथे विदेशातुन व देशातुन अनुयायी आले होते त्यांना लगेच परत पाठविण्यात आले आणि दि. 22 . 03 . 2020 नंतर देशातील व विदेशातील ज्या लोकांचे परतीचे रिझर्वेशन होते त्यांना लॉकडाऊनमुळे रेल्वे सेवा, विमान सेवा, परिवहन व्यवस्था बंद केल्यामुळे हजरत निजामुद्दीन मरकजमध्ये थांबलेल्या देशातील व विदेशातील लोकांना परत जाणे शक्य झाले नाही व त्यांना त्याचठिकाणी थांबावे लागले. याबाबत देशातील लोकांना आपआपल्या राज्यात जाण्याकरिता परवानगी देण्याबाबत हजरत निजामुद्दीन मरकज व्दारा दिल्ली शासनास व केंद्र शासनास वारंवार पत्रव्यवहार करण्यात आले. तरीही त्यांना कोणतीही परवानगी देण्यात आली नाही.
यानंतर दिल्ली सरकारव्दारा मरकजमधील लोकांची वैद्यकीय तपासणी करुन कोरोना संदर्भात तपासणी करण्यात आली त्याबाबत सर्वांनी संपुर्ण सहकार्य केले. परंतु सदर संधीचा गैरफायदा घेत व आपल्या चॅनेलची TRP वाढविण्याकरिता ABP News , India TV , Republic TV , Aaj Tak , News State , Sudarshan News आणि Zee News या चैनल मधील एंकर व एडीटर हे हजरत निजामुद्दीन येथील तबलीग जमात " मरकज " विरुध्द खोट्या आधारहीन व बनावट बातम्या प्रसिध्द करुन अराजकता निर्माण करुन दोन समाजामध्ये व्देष पसरवुन सामाजिक व जातीय सलोखा संपवुन चुकीच्या पध्दतीने लोकांसमोर जातीयता वाढविण्याच्या दृष्टीने सदर प्रकरणाल चुकीच्या पध्दतीने मांडुन देशाची एकता व अखंडता बाधीत करण्याचे काम केलेले आहे. आणि देशातील जनतेसमोर कोरोना जिहाद, तालीबानी विचारसरणी, आतंकवादी, देशविरोधी संघटन यासारखे शब्दाचा वापर करुन एका विशेष धर्माबद्दल व त्यांचा प्रचार करणाऱ्या अनुयायीबद्दल व त्यांच्या विचारसरणीला पार्टीबा देणाऱ्या लोकांविरुध्द इतर समाजामध्ये मोठी दरी निर्माण केलेली आहे. त्याचप्रमाणे तबलीगी जमातचे काम करणारे अनुयायी व धर्मगुरुबद्दल अपशब्दही वापरुन लोकांच्या सामाजिक भावना दुखावण्यात आलेल्या आहेत हि अत्यंत निंदणीय व चिंताजनक बाब आहे. केंद्र व राज्य शासनाव्दारे आपल्या स्थरावर लॉकडाऊनचे व संचारबंदीचे उल्लंघन करणाऱ्या लोकांविरुध्द कारवाई होत आहे. तरीसुध्दा या टिव्ही चॅनेलव्दारे कोरोना प्रादुर्भावासाठी एका विशिष्ट समाजाला दोषी ठरविले जात असुन त्यासंदर्भातल्या बातम्या जास्त प्रमाणात प्रसारीत करुन देशातील दोन सामाजामध्ये फार मोठी दरी निर्माण करुन देशाची एकता, अखंडता, जातीय सलोखा नष्ट केलेला आहे. तरी एंकर व एडिटर यांच्या विरोधात विराट राष्ट्रीय लोकमंच कॉन्सिल कडून एका निवेदना मार्फत लेखी तक्रार शासनाकडे करण्यात आली आहे.
***