सोशल एज्युकेशन मूव्हमेंट हिंगोली द्वारा डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त स्पर्धा परीक्षेचे आयोजन...


हिंगोली :-  येत्या 14 एप्रिलला भारताला लोकशाहीची अमूल्य देणगी देण्यात ज्यांचा सींहाचा वाटा असून समस्त भारतीयांना संविधानाच्या एका सूत्रात बांधून स्वातंत्र्य , समता , बंधूत्व, न्याय , मानवता या उच्च कोटीच्या मानवी मूल्यांची देणगी देणाऱ्या विश्वरत्न , भारत भाग्यविधाते , राष्ट्र निर्माते बोधिसत्व , परमपूज्य  डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 129 वी जयंती  आहे.ती आपण दरवर्षी मोठ्या थाटामाटात साजरी करीत असतो. बाबासाहेब हे विश्व ज्ञानपुरुष असून युनो मध्ये त्यांची जयंती साजरी होते. त्यांनी दिलेली मानवी मूल्ये जगभर पोहोचल्यामुळे व ते SYMBOL OF KNOWLEDGE असल्यामुळे त्यांची जयंती  आपल्या  भारतासह 102 पेक्षा अधिक राष्ट्रांत  साजरी होते. कारण ते मानवमुक्तीचे प्रणेते आहेत. स्त्री मुक्तीचे प्रवर्तक आहेत .विद्यार्थी, अध्यापक, संशोधक, वाचक, अभ्यासक, शास्त्रज्ञ, बँकिंग व्यवस्था, लेखक, साहित्यिक , व्याख्याते, राजकारणी व राज्यकर्ते, सामाजिक कार्यकर्ते  यांचे मार्गदर्शक तथा प्रेरणास्थान आहेत.   जगभरातील  वंचित, उपेक्षित, शेतकरी, कष्टकरी यांचे ऊर्जास्रोत आहेत.  परंतु बांधवांनो यावर्षी कोरोनाव्हायरस ने संपूर्ण जगात थैमान घातले आहे.या महामारीचा मुकाबला करण्यासाठी आपल्या सरकारने 14 एप्रिल पर्यंत लॉ क डाऊन केलेले आहे. सर्वत्र कलम 144 लागू आहे. त्यामुळे आपल्याला अशा परिस्थितीत घराबाहेर पडता येणार नाही.  प्रत्येकाने आपल्या घरातच जयंती साजरी करावी. कोणीही शासन, प्रशासन, पोलीसांच्या आदेशांचे कोणीही उल्लंघन करु नये.
           यावर्षी  सोशल एज्युकेशन मूव्हमेंट जिल्हा हिंगोली तर्फे " डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवन कार्य, स्पीचेस अॅन्ड रायटिंग या विषयावर स्पर्धा घेण्यात येणार आहे.


स्पर्धा परीक्षेसाठी पुढील  नियम अटी व शर्ती आहेत .


1)स्पर्धा परीक्षा दिनांक 14/4/ 2020
वेळ : दिड तास - दुपारी 1:30ते 3:00  ही आहे .


2) स्पर्धा परीक्षा स्थळ : स्पर्धकाचे स्वतःचे घर , म्हणजे स्पर्धेत   भाग घेणाऱ्यांनी आपल्या स्वतःच्या घरूनच ही परीक्षा द्यायची आहे .


3)नाव नोंदणी दिनांक: 10 एप्रिल 2020 ते 12 एप्रिल 2020   अशी तीन दिवस करता येईल . नाव नोंदणी नि: शुल्क आहे .
                         
4) स्पर्धक हिंगोली जिल्ह्यातील असावा.       


5)  या स्पर्धेत  पर्यवेक्षक तथा परीक्षक आणि समन्वयक यांच्या कुटुंबातील कोणत्याही सदस्यास भाग घेता येणार नाही .[ प्रश्नपत्रिका सराव / अभ्यास म्हणून सोडवू शकतात ]


6)  स्पर्धसाठी वयाची अट नाही .
स्पर्धा मुले-मुली,पुरुष -स्त्रिया अशा सर्वांसाठी खुले आहे


7) परीक्षा 50 गुणांची आहे .


8) एका परिवारातील एकाच स्पर्धकाला  स्पर्धात भाग घेता येईल .
             
9) नाव नोंदणी झाल्यानंतर स्पर्धक व पर्यवेक्षक यांचा 13 एप्रिल रोजी सकाळी 11 वाजेपर्यंत  व्हाट्सअप ग्रुप तयार करण्यात येईल.      


10 ) त्यासाठी स्पर्धकाला आपले पूर्ण नाव , लिंग , जन्मतारीख , शिक्षण , गावाचे - नगराचे नाव ही माहीती 9822917567 या एकाच Whatsapp नंबरवर पाठवावी .
     
11) स्पर्धकाला प्रश्नपत्रिका परीक्षा सुरू होण्यापूर्वी एका मिनिट अगोदर whatsapp गृपवर  वर पाठविली जाईल.


12) उत्तर पत्रिका उदाहरणार्थ प्रश्न क्रमांक 1)....... 2) .........3).....50 अशी असेल .


13)प्रश्न क्रमांका  समोर स्पष्ट उत्तरे लिहावीत.      ( प्रश्न लिहू नयेत)  


  14) हस्ताक्षर किमान स्पष्टपणे कोणालाही सहज ओळखता येईल असे असावे . कॉंम्यूटरवरील उत्तरपत्रिका चालेल .


15) आपली उत्तर पत्रिका तयार  झाल्यावर सर्वात शेवटी खाली उजव्या बाजूस स्पर्धकाने स्वतःची स्वाक्षरी करून उत्तरपत्रिकेचा स्पष्ट फोटो पाठवावा.     PDF चालेल .
          
16) या स्पर्धेसाठी पुढील 14 पर्यवेक्षक असतील.ते त्यांच्या  घरातूनच उत्तरे तपासतील . सर्वाना समप्रमाणात उत्तरपत्रिका तपासणीचे कार्य देण्यात येईल .
               
17) समान गुण मिळाल्यास उत्तर पत्रिका पाठविण्याची वेळ विचारात घेण्यात येईल.


18) परीक्षक हे सामाजिक कार्यकर्ते असल्यामुळे ते प्रश्नपत्रिका तपासणीत कोणत्याही प्रकारे पक्षपात करणार नाहीत .
परीक्षकांनी दिलेला निर्णय अंतिम राहील . त्यास कोणासही आव्हान देता येणार नाही .


19) 14 विजेत्यांची नावे 14  किंवा 15 तारखेला  गृपवर टाकण्यात येतील .


20) विजेत्या स्पर्धकाला त्याच्या बँक खात्यावर 15 किंवा 16 एप्रिल रोजी Online बक्षीस  जमा करण्यात येईल.
त्यासाठी स्पर्धकाने
बँकेच्या खातेधारकाचे नाव :
बँकेचे नाव :
शाखेचे नावः
खाते क्रमांक :
IFSC CODE :
ही माहिती द्यावी .


21) विजेत्या स्पर्धकांचा  SEM च्या वतीने आयोजित सावित्रीबाई फुले जयंती 2021 च्या कार्यक्रमात सत्कार करून  प्रमाणपत्रेही देण्यात येतील .[ तत्कालिन नैसर्गिक परिस्थितीनुसार . जशी जगभर विद्यमान परीस्थिती आहे ]


22) अपरिहार्य समस्या , अडचण   उदभवल्यास SEM जो निर्णय घेईल तो सर्वांवर बंधनकारक असेल .


बक्षिस क्रमांक         बक्षिस रुपये
    पहिले                        1414      
   दुसरे                           1314          
  तिसरे                          1214       
  चौथे                            1114        
  पाचवे                          1014     
  सहावे                          0914        
  सातवे                          0814      
आठवे                          0714    
नववे                            0614        
दहावे                            0514        
अकरावे                        0414      
बारावे                           0314        
तेरावे                            0214        
चौदावे                          0114
----------------------------------------
एकूण रुपये                  10696


आयोजक: सोशल एज्युकेशन मूव्हमेंट, हिंगोली जिल्हा.        अधिक माहितीसाठी संपर्क : पोघे गुरुजी   - 9822917567 सर्व स्पर्धकांनी वरील Whatsapp नंबरवर वरील माहिती पाठवावी. पि.यू. बनसोडे  9373704051 जी .एस.मनवर  9921989542 व्ही.सी.कांबळे   9766778490 एस.पी.सदावर्ते  8888015033
वाय.बी.चाटसे   9158631789 एम.एन.भालेराव 9823324621 एस.जी.गायकवाड 9307888498
डी .एम. कांबळे 9623936327 ए .टी. कांबळे   7020475824 / टी.एन.जावळे   9673113255
एल.बी.पाईकराव 9552850060 आर.आर.नरवाडे े8087283941 डी.एन.कंधारे   9850251044


समन्वयक म्हणून बी.सी. कांबळे 9881242487 हे काम बघत आहेत. सोशल एज्युकेशन मूव्हमेंट, च्या या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
***