लॉकडाऊनमुळे पुण्यात अडकलेल्या विद्यार्थांनो, तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची बातमी!


विद्यार्थी खोलीमध्ये अडकले आहेत, त्यांना गावाकडे जायचे आहे, त्यामुळे राज्य सरकारने आमची वैद्यकीय तपासणी करुन गावी जाण्याची व्यवस्था करावी अशी मागणी केली आहे.


पुणे : लाॅकडाऊन काळात पुण्यात अडकून पडलेल्या विद्यार्थांची माहिती संकलीत करण्याचे काम एमपीएससी स्टुडंट्स राईट या संघटनेने सुरू केले आहे. कोणत्या जिल्ह्यातील किती विद्यार्थी पुण्यात आहेत याची माहिती राज्य सरकारला सादर केली जाणार आहे.
पुण्यात लाॅकडाऊन झाल्यानंतर स्पर्धा परीक्षा व इतर शिक्षण घेणारे अनेक विद्यार्थी गावाकडे जाऊ शकत नाहीत. त्यांच्या जेवणाचे हाल होत असल्याने एमपीएससी स्टुडंट्स राईट संघटनेने विद्यार्थी कोणत्या कोणत्या भागात अडकून पडले आहेत याची माहिती घेतली. सध्या रोज २१ ठिकाणी विद्यार्थांना जेवणाचे डेबे पोहचवले जात आहेत. 


विद्यार्थी खोलीमध्ये अडकले आहेत, त्यांना गावाकडे जायचे आहे, त्यामुळे राज्य सरकारने आमची वैद्यकीय तपासणी करुन गावी जाण्याची व्यवस्था करावी अशी मागणी केली आहे. मात्र अद्याप यावर कोणताही निर्णय झालेला नाही.


"या माहितीमुळे पुण्यात कुठल्या जिल्ह्यातील किती विद्यार्थी अडकले आहेत याची व्यवस्थित माहिती जमा होईल. ही महिती राज्य सरकारला सादर करून त्यांची वैद्यकीय तपासणी करून गावाकडे पाठविण्याची व्यवस्था करावी यासाठी पाठपुरावा केला जाणार आहे."
- महेश बडे, एमपीएससी स्टुडंट्स राइट्स


दरम्यान, या विद्यार्थांची संपूर्ण माहिती संकलीत करण्याचे काम संघटनेने सुरू केले असून, https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSd4RdrOfgCvByquUxRmC9lz8lrx6vIbJDeKIYikapRZ2tu7vQ/viewform या लिंकवर माहिती भरण्याचे आवाहन महेश बडे यांनी केले आहे. 


***