Coronavirus : देशात दररोज ५५ हजार चाचण्या – डॉ. हर्षवर्धन


जगाच्या तुलनेत आपला मृत्यूदर ३ टक्के असल्याचंही त्यांनी सांगितलं.


करोना व्हायरसनं देशात थैमान घातलं आहे. अशा परिस्थितीत करोनाच्या चाचण्या होणं हे सर्वात मोठं हत्यार असल्याचं म्हटलं जात आहे. इंडियन काऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चनंदेखील (आयसीएमआर) ही माहिती दिली होती. भारत सध्या मोठ्या प्रमाणात करोनाच्या चाचण्या करण्यावर भर देत आहे. देशात सध्या दररोज ५५ हजारांपेक्षा अधिक चाचण्या करण्यात येत असून आतापर्यंत ५ लाखांपेक्षा अधिक चाचण्यात करण्यात येत आहेत. सध्या आपली क्षमता दिवसाला ५५ हजार चाचण्या करण्याइतकी झाल्याची माहिती डॉ. हर्षवर्धन यांनी दिली आहे.


जगाच्या तुलनेत आपला मृत्यूदर ३ टक्के आहे तर केस दुप्पट होण्याचा दरही ८.७८ टक्क्यांच्या जवळपास असल्याची माहिती त्यांनी दिली.
गुरूवारी डॉ. हर्षवर्धन यांनी अन्य देशांच्या आरोग्यमंत्र्यांसह व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा केली. यावेळी ६ क्षेत्रातील ६ देशांनी माहितीचं सादरीकरण केलं. दक्षिण पूर्व आशियामार्फत डॉ. हर्षवर्धन यांनी माहितीचं सादरीकरण केलं.


दरम्यान, या सादरीकरणानंतर डॉ. हर्षवर्धन यांनी भारताची करोना चाचणीची क्षमता दररोज ५५ हजारांपर्यंत पोहोचल्याचं सांगितलं. तसंच जगाच्या तुलनेत भारताचा मृत्यूदर ३ टक्के असून केस दुप्पट होण्याचा दरही ८.७८ टक्के असल्याची माहिती त्यांनी दिली. सोशल डिस्टन्सिंगला आम्ही सोशल वॅक्सिन म्हणून वापर करण्यास सांगत असल्याचे ते म्हणाले. तसंच देशात करोनाग्रस्तांची संख्या वाढून २१ हजार ७०० वर पोहोचली असल्याचंही त्यांनी सांगितलं. तसंच सध्या भारतातच पीपीई किटचं उत्पादन करत असल्याचंही त्यांनी नमूद केलं.
***