ओमप्रकाश देवडा पीपल्स को-ऑप. बँके तर्फे Covid-19 निर्मुलनासाठी 10 लाखाची मदत


हिंगोली : Covid-19 या महामारीचे राष्ट्रीय संकट आपल्या देशा पुढे व राज्या पुढे आले आहे. ज्या मध्ये अनेक नागरीक कोरोना ग्रस्त झालेले आहेत. या परिस्थितीत खारीचा वाटा म्हणून ओमप्रकाश देवडा पीपल्स को-ऑप. बँके तर्फे PMCare Fund Covid - 19 साठी रु . 5,00,000/- ( अक्षरी रक्कम रुपये पाच लाख ) व CM Relief Fund Covid-19 साठी रु. 5,00,000/- ( अक्षरी रक्कम रुपये पाच लाख ) असे एकूण रु. 10, 00,000/- चा मदत निधी हिंगोली जिल्ह्याचे उपजिल्हाधिकारी श्री जगदीश मणियार तथा निवासी उपजिल्हाधिकारी मा. श्री चंद्रकांत सूर्यवंशी यांना सुपुर्द करण्यात आला. याप्रसंगी बँकेचे अध्यक्ष सुनिल देवडा, उपाध्यक्ष श्री रुपचंद बज, बँकेचे संचालक श्री ज्ञानेश्वर मामडे, श्री शशिकांत दोडल, बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री किशोर जोशी, उपसरव्यवस्थापक श्री शशिकांत कंदी, आदी उपस्थित होते.


***