कोरोनाच्या संकटात राजकारण करणाऱ्यांना मुख्यमंत्र्यांनी सुनावले खडे बोल….


आयुष्यात दुसरं केलं तरी काय? कोरोना व्हायरस च्या संकटात राजकारण करणाऱ्यांना मुख्यमंत्र्यांनी सुनावलं
मुख्यमंत्र्यांनी राज्यातील जनतेशी संवाद साधताना कोरोना व्हायरस च्या लढाईत राजकारण करणाऱ्यांना चांगलंच सुनावलं.


‘आज संपुर्ण देशात वेगळ्या पक्षाचे मुख्यमंत्री आहेत. पण सर्व मुख्यमंत्री राजकारण बाजूला ठेवून आज एकवटलेले आहेत. सगळे जण मोदीजींच्या सोबत आहेत. सर्व राज्य सरकार केंद्र सरकारच्या सोबत आहेत. केंद्र सरकार आपल्याला हवं नको ते विचारत आहे. अत्यंत चांगल्या पद्धतीने हे काम सुरु आहे. याच्यामध्ये मला कुठंही वितुष्ठ नको आहे. मी सर्वांना हेच सांगतो आहे. ही राजकारण करण्याची वेळ नाही. राजकारण आपल्या पाचवीलाच पुजलेलं आहे. किती काळ राजकारण करणार? आणि आयुष्यात दुसरं केलं तरी काय? मला कोरोना च्या लढाईत राजकारण नको आहे. ही पक्षीय राजकारण इथल्या इथं थांबली पाहिजेत. जे चित्र मी पंतप्रधानांच्या गेल्या व्हिडीओ कॉन्फरंसिंग मध्ये पाहतो आहे. हे जर असंच राहिलं, ही एकजूट अशीच राहिली तर आपण या संकटावर मात नक्कीच करणार. मात्र, आपण जर असेच एकत्र राहिलो तर आपला देश जगातील महासत्ता होईल’.


असं म्हणत राजकारण करणाऱ्यांना मुख्यमंत्र्यांनी चांगलं सुनावलं आहे.


दरम्यान  मुख्यमंत्र्यांनी ‘तुम्ही खबरदारी घ्या, मी जबाबदारी घेतो’. असं म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात किमान 30 एप्रिल पर्यंत लॉकडाऊन वाढवण्याची घोषणा केली आहे. राज्यातील कोरोना ग्रस्त रुग्णांची संख्या लक्षात घेता मी राज्यात लॉकडाऊन ची मुदत ३० एप्रिल पर्यंत वाढवत असल्याची घोषणा केली आहे.


या वाढलेल्या कालावधीचे स्वरूप कसे असेल, मजूर व कामगारांचे काय तसेच उद्योगांसाठी काय करायचे या बाबी 14 एप्रिलपर्यंत आम्ही स्पष्ट करु असं यावेळी मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे.


आज पंतप्रधानांची राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसमवेत व्हिडीओ कॉन्फरन्स झाली. वर्षा निवासस्थानाहून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सहभागी होऊन संवाद साधला. यावेळी गृहमंत्री अनिल देशमुख, आरोग्यमंत्री राजेश टोपे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, मुख्य सचिव अजोय मेहता उपस्थित होते.
***