डॉ . बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक महोत्सव समिती, पुणे द्वारा डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त निबंध स्पर्धेचे आयोजन...


पुणे :-  येत्या 14 एप्रिलला भारताला लोकशाहीची अमूल्य देणगी देण्यात ज्यांचा सिंहाचा वाटा आहे, ज्यांनी समस्त भारतीयांना संविधानाच्या एका सूत्रात बांधून स्वातंत्र्य, समता, बंधूत्व, न्याय, मानवता या उच्च कोटीच्या मानवी मूल्यांची देणगी देणाऱ्या विश्वरत्न, भारत भाग्यविधाते, राष्ट्र निर्माते, बोधिसत्व परमपूज्य  डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 129 वी जयंती दिनाचे औचित्य साधून वैचारिक जयंती साजरी करण्या हेतू आहे.  ज्ञानसूर्याला वाचन - लेखन करून अभिवादन करण्यासाठी  डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक महोत्सव समिती, पुणे  द्वारा डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. निबंलेखनासाठी पाच विषय देण्यात आले आहेत.
१. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा विज्ञानविषयक दृष्टिकोन.
२. डॉ . बाबासाहेब आंबेडकरांचे मूकनायक व सद्यकालिन पत्रकारिता.
३. भारताच्या उभारणीत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे योगदान. 
४. काश्मिरमधील सद्यस्थिती व डॉ . बाबासाहेब आंबेडकरांची भूमिका.
५. भारतीय राजकारणात दलितांचे भवितव्य.
       या  विषयावर निबंध टाइप करू पीडीएफ मध्ये babasahebjayanti2020@gmail.com या ई मेलवर दिनांक २० एप्रिल २०२० पूर्वी पाठवावेत. तसेच प्रत्येक विषयाला प्रत्येकी तीन पारितोषिके  प्रथम पारितोषिक : रू. ३000/- (तीन हजार रूपये) व्दितीय पारितोषिक : रू. २०००/- (दोन हजार रूपये) तृतीय पारितोषिक : रू. १०००/- (एक हजार रूपये) असे बक्षिसाच स्वरूप आहे. निबंधा ची शब्द मर्यादा : १२०० शब्द तसेच एकापेक्षा जास्त विषयावर निबंध लिहू शकता. या निबंध स्पर्धेसाठी प्रवेश विनामूल्य आहे. अधिक माहितीसाठी प्रा. सुरवसे ७३५०७८११०४ हे आहेत तर या निबंध स्पर्धेचे आयोजक परशुराम वाडेकर संयोजक डॉ. विजय खरे, डॉ. अनिल सपकाळ, प्रा. राजाभाऊ भैलुमे, प्रा. किरण सुरवसे, डॉ. निशा भंडारे, दिपक म्हस्के हे आहेत. च्या या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
***