हॅकर्सकडून करोना रिलीफ फंडाचे २६१ कोटी लंपास


चीनमध्ये आलेल्या एका शहरातील करोना व्हायरस आता २०० पेक्षा जास्त देशात पोहोचला आहे. करोना व्हायरसला चीनपेक्षा मोठा फटका बसला आहे. ज्यात अमेरिका, इटली, जर्मन यासारखे देश आहेत. करोना व्हायरसमुळे जगभरातील उद्योगधंदे, व्यापार बंद असल्याने चांगलाच आर्थिक फटका बसला आहे. करोना व्हायरसवर मात करण्यासाठी जगभरात प्रयत्न सुरू आहेत. करोना विरुद्धच्या लढाईत अनेक जण आपापल्या परीने मदत करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. परंतु, ही लढाई सुरू असताना यात हात धुवून घेणाऱ्यांची संख्याही वाढताना दिसत आहे. इंटरनेट युजर्स आणि नेटवर्क्सला हॅकर्सने लक्ष्य करण्यास सुरूवात केली आहे. हॅकर्सने कोट्यवधी रुपयांचा डल्ला मारल्याची घटना उघडकीस आली आहे. जर्मन सरकारच्या मदत निधी फंडात जमा झालेल्या रकमेवर हॅकर्सने डल्ला मारला आहे. हॅकर्सने जर्मनीच्या नॉर्थ राइन वेस्टफेलिया प्रोविंन्स मध्ये सरकारी वेबसाइटवर डल्ला मारला आहे. जवळपास २६१ कोटी कोटी रुपये हॅकर्सने पाहता-पाहता पळवले आहे.


हॅकर्सने सरकारी वेबसाईटची एक कॉपी तयार केली. ज्यात करोना व्हायरस संबंधित आर्थिक मदत वाटप केली जाणार होती. हा सायबर अटॅक दोन स्टेजवर करण्यात आला. सर्वात आधी हॅकर्सने फेक वेबसाइटची लिंक फिशिंग अटॅक करून ई-मेल मोहीम राबवली. या मोहिमेतून हजारो युजर्संना पाठवण्यात आली. तसेच त्यांच्याकडून सर्व माहिती जमा करण्यात आली. त्यानंतर हॅकर्सने अधिकृत वेबसाइटवर आर्थिक मदतीची मागणी केली. त्यासाठी नागरिकांच्या डेटाचा वापर केला. यावेळी हॅकर्सने अकाउंटची माहिती आणि नंबर बदलले. व रक्कम ट्रान्सफर केली.


सरकारने स्वतः पाठवली रक्कम


सरकारला या सायबर अटॅकची माहिती ५७६ रिपोर्ट्स आल्यानंतर झाली. अधिकृत वेबसाइटला सरकारने ९ एप्रिलला बंद केले. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, हा स्कॅम मार्चच्या दुसऱ्या आठवड्यात सुरू करण्यात आला होता. एका जर्मन न्यूज पेपरच्या रिपोर्टनुसार, सरकारने आर्थिक मदती संबंधित असलेली ३८०,००० रिक्वेस्ट पाठवण्यात आली होती. ज्यात केवळ ३६०,००० ला मंजुरी देण्यात आली होती. तसेच त्यांना मदत पाठवली होती. या ३६०,००० रिक्वेस्ट्सपैकी ३५०० ते ४५०० रिक्वेस्ट् या स्कॅमचा भाग होती.


....म्हणून फ्रॉड झाला



करोना व्हायरस संबंधित रिलिफ फंडासाठी सरकारकडून प्रत्येक कर्मचाऱ्यांच्या खात्यावर ९००० युरो (७.४ लाख रुपये) आणि ५० कर्मचाऱ्यांहून अधिक कॉर्पोरेशनला २५ हजार युरो (२० लाख रुपये) खात्यावर मदत पाठवण्यात आली. या रकमेतून करोना व्हायरसमुळे आर्थिक नुकसान झालेले भरून काढण्यासाठी मदत देण्यात येणार होती. या हिशोबानुसार, जर्मन सरकारने ३१ मिलियन युरो (जवळपास २५७ कोटी) ते १०० मिलियन युरो (जवळपास ८१० कोटी रुपये) पर्यंत नुकसान सोसावे लागले आहे. फुल प्रूफ ऑथेंटिकेशन नसल्यामुळे हॅकर्सने हा सर्वात मोठा सायबर हल्ला चढवला. आता पोलीस याचा शोध घेत आहे.


***