दारू बंदी उठवण्याकडे लक्ष देण्यापेक्षा गरिबांसाठी राशन उपलब्ध करून देण्याकडे लक्ष द्या! या मागणीचे मुख्यमंत्र्यांना सा.तेजस्वी लेखणी मार्फत निवेदन.....


हिंगोली : सा. तेजस्वी लेखणी संपादक प्रा. बलखंडे यु.एच. यांच्या वतीने मा.ना. उद्धवजी ठाकरे, मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य. यांना जिल्हाधिकारी यांच्या मार्फत पाठवलेल्या निवेदनात जाहीर निवेदन उल्लेख केल्या प्रमाणे, काही नेतेमंडळी शासनाच्या आर्थिक फायद्यासाठी दारूची दुकाने सुरू करा, असे सुचवित आहेत! परंतु असे सुचविणे कितपत योग्य आहे? असे केल्यास गरीब जनसामान्य कुटुंबात सध्याच्या कोरोनाच्या महामारीत काय विकृत परिणाम होतील यावर सखोल विचार करणे गरजेचे आहे. म्हणून दारूची दुकाने सुरू करून शासनाच्या आर्थिक फायद्यासाठी सामाजिक अंतर ठेवण्याचा बट्ट्याबोळ करू नये व  यातून गोरगरिबांच्या जीवाशी खेळण्यापेक्षा आजही हक्कदार लाभार्थ्यांना शिधापत्रिका नाही त्यांना शिधापत्रिका व जगण्यासाठी त्वरित राशन मिळवव अशी मागणी निवेदनात केली आहे.


तसेच वास्तविक पाहता, आज भारत देशातच नव्हे तर जगामध्ये कोरोणामुळे अनेकांचा जीव जात आहे. या भीतीमुळे सर्वांचेच जनजीवन विस्कळीत झाले आहे. देशात सर्वत्र लॉकडॉउन करण्यात आहे. एकमेकांमध्ये अंतर ठेवून जनता नियमांचे पालन करीत कोरोनाचा प्रतिकार सर्वत्र युद्ध पातळीवर होत आहे. आज सर्वत्र वाईट परिस्थिती निर्माण झाली आहे. गरिबांच्या हाताला काम नाही, खिशात पैसा नाही, खायला अन्न नाही अशा वाईट परिस्थितीत आपण जर दारूची दुकाने सुरू केली तर गोरगरीब जनता अन्नाविना दारू पिऊन बेभान होऊ शकतील, त्यांना सामाजिक अंतर ठेवण्याचे मुळीच भान राहणार नाही. कौटुंबिक अंतर्गत वादविवादामध्ये वाढ होऊन आज लॉकडॉउन मुळे जी सामाजिक शांतता निर्माण झाली आहे, ती अशांत होईल. अशा परिस्थितीत जगाला पंचशील तत्वांची गरज आहे. यामुळे दारूचे दुकाने कृपया सुरू करू नका. कारणं जनसामान्य घटकाला कोरोना संकटाचा सामना करताना दारूची दुकाने सुरू करण्याची परवानगी देऊन आणखी दुसऱ्या संकटाचा सामना करण्यास भाग पाडू नये.


      या कोरोनाच्या संकटा बरोबर राज्याची आर्थिक घडी बसवण्याकरिता अर्थविषयक तज्ञांची एक विशेष वित्तीय व्यवस्थापन समिती त्वरित गठीत करून राज्याच्या तिजोरीत वृद्धी होईल अशा सर्वसमावेशक सुयोग्य मार्गांचा शोध घेऊन उपाय योजनांची निर्मिती त्याद्वारे करावी. तसेच प्रत्यक्ष संबंधित अधिकाऱ्यांनी स्वस्त धान्य वाटप करणाऱ्या दुकानदारांची भेट घेऊन काळाबाजार करणाऱ्या दुकानदारांचे परवाने त्वरित रद्द करून शिधापत्रिका व राशन ज्या त्या प्रभागातील संबंधित नगरसेवकांच्या जबाबदारीने गरिबांना देऊन उपकृत करावे ही आपणास विनंती निवेदनात करण्यात आली आहे.
***