कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता सर्व चाचण्या आणि उपचार (Corona Virus Treatment Free) मोफत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
लातूर : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता सर्व चाचण्या आणि उपचार (Corona Virus Treatment Free) मोफत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. वैद्यकीय शिक्षण आणि औषधी द्रव्ये विभागाच्या अखत्यारीतील शासकीय वैद्यकीय, दंत महाविद्यालयांमध्ये आणि रुग्णालयांमध्ये कोरोनावरील उपचार निशुल्क करण्यात येणार आहे. वैद्यकीय शिक्षण आणि सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांनी याबाबतची माहिती दिली.
राज्यात कोरोना आजाराच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत (Corona Virus Treatment Free) आहे. हे विचारात घेऊन वैद्यकीय शिक्षण आणि औषधी द्रव्ये विभागाच्या अखत्यारीतील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, दंत महाविद्यालय आणि रुग्णालयांमध्ये कोरोना रुग्णांच्या सर्व तपासण्या आणि उपचार यापुढे निशुल्क करण्यात येणार आहेत. कोरोनाग्रस्त रुग्णांना सुलभतेने उपचार घेता यावेत. यावर उपचार घेण्यासाठी अधिकाधिक रुग्णांनी पुढे यावे या दृष्टीने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.
कोविड-19 ग्रस्त रुग्णावर उपचारासाठी अधिक पैसे लागतील या भीतीपोटी अनेक रुग्ण आपला आजार लपवतात, असे अनेक प्रकार घडले आहेत. या निर्णयामुळे जास्तीत जास्त रुग्ण पुढे येऊन स्वतः वर उपचार करून घेतील. त्याचप्रमाणे या निर्णयामुळे अधिकाधिक चाचण्या घेणे शक्य होणार आहे. तसेच कोविड-19 ला प्रतिबंध करण्याच्या दृष्टीने हा निर्णय महत्त्वपूर्ण ठरेल असेही वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी म्हटले.
***