चंद्रपूर :- सध्या भारतात व संपूर्ण जगभरात परीस्थिती गंभीर आहे, अश्या स्थितीत आपण सर्वानी ह्यावेळीची भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर ह्यांच्या १२९ वी जयंती अनोख्या पध्दतिने घरातच राहुन साजरी करुया व ह्या lockdown ला सम्पूर्ण 100 % प्रतीसाद देण्या हेतू येत्या 14 एप्रिलला भारताला लोकशाहीची अमूल्य देणगी देण्यात ज्यांचा सिंहाचा वाटा आहे, ज्यांनी समस्त भारतीयांना संविधानाच्या एका सूत्रात बांधून स्वातंत्र्य, समता, बंधूत्व, न्याय, मानवता या उच्च कोटीच्या मानवी मूल्यांची देणगी देणाऱ्या विश्वरत्न, भारत भाग्यविधाते, राष्ट्र निर्माते, बोधिसत्व परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 129 वी जयंती दिनाचे औचित्य साधून वैचारिक जयंती साजरी करण्या हेतू आहे. या स्पर्धेचे स्वरूप पुढील प्रमाणे आहे, स्पर्धा ३ प्रकारे होणार आहे, तर तुम्हाला करायच असं आहे की...
१) सहकुटूंब १४ एप्रिल २०२० रोजी घरातच जयंती वेगवेगळया पध्दतिने साजरी करून Video पाठवायचे आहेत. (वयोगट - OPEN)
२) बाबासाहेबांचे काही संदेश देनारी एखादी रांगोळी किंवा चित्र काढायचा आहे.
३) बाबासाहेबांचा एखादा लेख किंवा कविता लिहायचा आहे.
तुम्ही कुठल्या ही प्रकारात सहभागी होऊन त्याचे Photo/Video काढून आपल्या वयोगटानुसार आपल नाव व पत्ता तसेच जन्म तारीख लिहून खालील क्रमांका वर WhatsApp किंवा Email : - rsf.republicanstudent.india@gmail.com या E - Mail ला पाठवू शकता. या स्पर्धे करिता वयोगट हा १) ६ ते १५ वर्ष २) १५ ते ३० वर्ष ३) ३० व त्यापुढील. तसेच सरकारने दिलेल्या कुठल्याच नियमांचे उल्लंघन होनार नाही ह्याची काळजी आपल्या सर्वाना घ्यायची आहे.
या स्पर्धेसाठी फोटो - विडिओ पाठवण्याची अंतिम तारीख : १४ एप्रिल २०२० रात्री १२ : ०० पर्यंत आहे. तर या स्पर्धेचे आयोजन रिपब्लिकन स्टुडंट फेडरेशन (इंडिया) चंद्रपूर तर्फे करण्यात आले आहे. अधिक माहिती साठी संपर्क :
१. मा. हर्षल खोब्रागडे मो. - ८७९३२२१०४३
२. मा. लुम्बिनी गणवीर - 9545985008
३. मा. सुरभी मोडक - 7448225010
३ . मा. जान्वी चांदेकर - 8007856086
***