हिंगोली आरोग्य विभागाकडून विविध पदाकरीता अर्जाची मागणी
हिंगोली,दि.3: कोरोना (कोव्हीड-19) विषाणूचा वाढता प्रादूर्भाव लक्षात घेता ही परिस्थिती हाताळण्यासाठी सेवानिवृत्त झालेले व आरोग्य सेवा देण्याकरीता सक्षम मनुष्यबळाची आवश्यकता असुन याकरीता इच्छूकाकडून अर्ज मागविण्यात येत आहे.
कोरोना (कोव्हीड-19) विषाणूचा वाढता प्रादूर्भाव हाताळण्यासाठी सुपर स्पेशालीस्ट, स्पेशालिस्ट वैद्यकीय अधिकारी, वैद्यकीय अधिकारी (MBBS), प्रयोगशाळा तंत्रज्ञ, औषधनिर्माण अधिकारी, ANM, GNM (फक्त महिला) आरोग्य सेवक इत्यादी कर्मचाऱ्यांची यादी तयार करण्यासाठी इच्छूक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. याकरीता इच्छूक उमेदवारांनी विहित नमुन्यात आपला अर्ज दि. 10 एप्रिल, 2020 पर्यंत dpmhingoli2020@gmail.com या ई-मेलवर सादर करावेत. अर्जाचा नुमना www.hingoli.nic.in या वेबसाईटवर उपलब्ध आहेत, असे जिल्हा शल्यचिकित्सक, हिंगोली आणि जिल्हा आरोग्य अधिकारी, हिंगोली यांनी कळविले आहे.
*****