महाराष्ट्राता प्लाझ्मा थेरपी आणि पूल टेस्टिंग यांना संमती मिळाली आहे अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ट्विटद्वारे दिली आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी घेतलेल्या व्हिडीओ कॉन्फरन्सिंगमध्ये सगळ्या राज्यांचे आरोग्यमंत्री उपस्थित होते. त्याच व्हिडीओ कॉन्फरन्समध्ये महाराष्ट्रात प्लाझ्मा थेरपी आणि पूल टेस्टिंगला केंद्राने मान्यता दिली आहे.
Portable Pulse Oxymter तसंच Portable X Ray Digosis ची मदत घेऊन लवकर रुग्ण निदान करणं, करोनामुळे होणारा मृत्यूदर कमी करणं. पीपीचे स्टरलायझेशन करुन त्याचा पुनर्वापर करण्यासाठी सुचवण्यात आलेल्या मुद्द्यांचंही विशेष कौतुक करण्यात आल्याचं राजेश टोपे यांनी त्यांच्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. खासगी वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये टेस्टिंग लॅब सुरु करण्याच्या मागणीला केंद्री मंत्र्यांनी प्रतिसाद दिला आहे असंही राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं.
महाराष्ट्रातील करोनाग्रस्तांची संख्या सहा हजारांच्याही वर गेली आहे. मात्र अशी स्थिती असेल तरीही घाबरुन जाऊ नका असं आवाहन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी बुधवारी झालेल्या फेसबुक लाइव्ह मध्ये सांगितलं. तसंच थोडीशीही लक्षणं दिसत असतील तर लगेच फिव्हर क्लिनिकमध्ये जा असाही सल्ला त्यांनी दिला. महाराष्ट्रात होणाऱ्या करोना चाचण्यांचं प्रमाण सर्वाधिक आहे. त्यामुळे रुग्णसंख्या वाढते आहे असंही त्यांनी स्पष्ट केलं.
***