शासन निर्णयानुसार शिक्षकांना 'वर्क फ्रॉम'चे निर्देश देण्यात आले होते. याचवेळी तंत्र शिक्षण संचालनालयाचे संचालक डॉ. अभय वाघ यांनी आढावा घेतला, तेव्हा बहुतांश इंजिनीअरिंग कॉलेजे आणि तंत्रनिकेतनांमध्ये २० टक्के अभ्यासक्रम बाकी होता, असे निदर्शनास आले. हा अभ्यासक्रम कसा पूर्ण करायचा यावर चर्चा झाली. तेव्हा ऑनलाइन माध्यमातून तो पूर्ण करण्याचे ठरविण्यात आले.
मुंबई : करोनाचा प्रसार रोखण्यासाठी राज्यात लॉकडाऊन जाहीर करण्यात आल्यानंतर शैक्षणिक संस्थाही बंद ठेवण्यात आल्या. या पार्श्वभूमीवर इंजिनीअरिंग कॉलेजांमध्ये राहिलेला अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी ऑनलाइन माध्यमांचा वापर करण्यास प्रारंभ झाला. त्यानंतर हा अभ्यासक्रम नुकताच पूर्ण करण्यात आला आहे. तंत्र शिक्षण संचालनालयाने राबविलेल्या या मॉडेलचा वापर विद्यापीठांनीही त्यांचे अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी करावा, अशी सूचनाही नुकत्याच पार पडलेल्या बैठकीत मंत्र्यांनी केल्याचे समजते.
२५ मार्च रोजी लॉकडाऊन जाहीर करण्यात आले. तेव्हापासून कॉलेजेही बंद ठेवण्यात आली. शासन निर्णयानुसार शिक्षकांना 'वर्क फ्रॉम'चे निर्देश देण्यात आले होते. याचवेळी तंत्र शिक्षण संचालनालयाचे संचालक डॉ. अभय वाघ यांनी आढावा घेतला, तेव्हा बहुतांश इंजिनीअरिंग कॉलेजे आणि तंत्रनिकेतनांमध्ये २० टक्के अभ्यासक्रम बाकी होता, असे निदर्शनास आले. हा अभ्यासक्रम कसा पूर्ण करायचा यावर चर्चा झाली. तेव्हा ऑनलाइन माध्यमातून तो पूर्ण करण्याचे ठरविण्यात आले. यासाठी सर्वप्रथम सर्व प्राचार्यांचा व्हॉट्सऍप ग्रुप तयार करण्यात आला. यात विविध विषयांचा अभ्यासक्रम ऑनलाइन कसा पूर्ण करता येईल याबाबत मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या. त्यासाठी स्वयम, कोर्सएरा, एडएक्स यासारख्या साइटचा वापर करून त्यावरून ऑनलाइन मॉड्युल शोधण्यात आले. हे मॉड्युल शिक्षकांनी विद्यार्थ्यांना झूम, गुगल क्लासरूम यांसारख्या ऍपच्या माध्यमातून थेट शिक्षण द्यावे, अशा सूचना देण्यात आल्या. यातून ऑनलाइन वर्ग भरविण्यात आले, असे डॉ. वाघ यांनी सांगितले.
***