लातूर जिल्हा भंगेवाडी गावातील कोरोना विषाणु संसर्ग प्रतिबंध समिती विरोधात ग्रामस्थांची शासनाकडे तक्रार...

दत्ता शंके
जिल्हा प्रतिनिधी रिपोर्ट


लातूर : सध्या जगभरात थैमान घातलेल्या कोरोना विषाणूचा संसर्ग आपल्या  देशात होऊ नये म्हणून केंद्र सरकार व महाराष्ट्र शासन अत्यंत योग्य पद्धतीने उपाय- योजना करीत आहेत.  ग्रामीण भागात पुणे- मुंबई येथून शेकडोंच्या संख्येने लोक परत आलेले आहेत. त्यांना जर वेळीच विलगीकरण केले नाही तर त्यांच्यापासून संबंध गावातील नागरीकांच्या आरोग्यास धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यासाठी आपल्या स्तरावरुन संबंधित लोकांना विलिनीकरण करण्याबाबत याद्याही पाठविण्यात आलेल्या आहेत.
      परंतु भंगेवाडी येथील कोरोना विषाणु संसर्ग प्रतिबंधासाठी ग्रामस्तरावर शासनाने गठीत केलेली समिती योग्य पद्धतीने काम करीत नसल्याने ग्राम स्तरावर योग्य पद्धतीने अंमलबजावणी केली जात नाही, असे येथील ग्रामस्थांचे मत आहे. परगावातुन लोकांना येऊन जवळ-जवळ २० ते २५ दिवस झाल्यानंतर त्यांना विलिनीकरण करण्याबाबत नोटीस देण्यात आली आहे. गावात परगावातुन लोक कामाला येत आहेत, तसेच गावातील लोक परगावी तिन-चार गावं ओलांडून कामाला जात आहेत. याबाबत समितीतील लोक गंभीर नाहीत. त्यांना वेळोवेळी सुचना देऊनही त्यांना प्रतिबंध केला जात नाही, म्हणुन प्रशासकिय व्यक्ती व समितीचे सचिव म्हणुन ग्रामसेवकांना शिपायांने फोनवरुन सांगितले असता "ग्रामसेवक आपल्याला काय करायचंय, आपणच लांब यहायचे!" अशा स्वरुपाचे भाष्य ग्रामसेवक करीत आहेत ,असे एका रिपोर्ट मधून कळाले आहे.
         सदर परिस्थितीची गंभीर दखल घेत रयत शेतकरी संघटनेचे लातूर जिल्हा युवा अध्यक्ष रुपेश श्यामराव शंके यांच्या नेतृत्वाखाली शासनाकडे ग्रामस्थांच्या आरोग्याच्या दृष्टीने योग्य ती कार्यवाही करावी अशी भंगेवाडी ग्रामस्थांची मागणी आहे. सदर प्रकारणाविषयी  निवेदन ही ग्रामस्थांनी जिल्हा अधिकाऱ्यांना दिले आहे.
***