हिंगोली, दि.6: दिल्ली येथील निजामुद्दीन मरकज, जिल्हा पानिपत हरियाणा, राज्यस्थान, उत्तर प्रदेश व देशाच्या इतर भागात झालेल्या जमात धार्मिक कार्यक्रमास जिल्ह्यातील जे नागरिक जावून आले आहेत. तसेच येथील (जिल्ह्यातील) नागरिकांच्या संपर्कात आले असतील अशा सर्व नागरिकांनी स्वतःहून आपली माहिती पुढील हेल्पलाईन क्रमांकावर साधुन द्यावी.
हेल्पलाईन क्रमांक : 1) श्री. चंद्रकांत सुर्यवंशी निवासी उपजिल्हाधिकरी तथा नोडल अधिकारी (कोवीड -19) जि.अ. का., हिंगोली भ्रमणनध्वनी क्रमांक : 9422612394, 2) श्री. राजेंद्र गळगे नायब तहसिलदार (म.) जि.अ. का., हिंगोली भ्रमणनध्वनी क्रमांक : 9422188972, 3) श्री. आर. आर. कंजे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी हिंगोली भ्रमणनध्वनी क्रमांक : 9405408939 या क्रमांकावर संपर्क साधून आपली माहिती द्यावी. याकरीता जिल्हा प्रशासनातर्फे आपणास योग्य ते सर्व सहकार्य करण्यात येईल.
कोरोना विषाणूस प्रतिबंध हाच कोविड -19 यावर उपाय असल्याने आपण आपले कुटुंब, आपले प्रियजन, आपला समाज, आपला गाव हे कोरोना विषाणूच्या संसर्गापासुन वाचविण्यासाठी पुढाकार घेवुन सहकार्य करावे, असे याद्वारे आवाहन करण्यात येत आहे. तसेच आपण जमात या कार्यक्रमास सामील झाल्याची माहिती प्रशासनापासुन जाणीवपुर्वक लपवुन ठेवल्यास व त्यातुन पुढे भविष्यात आपण कोरोना बाधित आढळुन आल्यास जाणीवपुर्वक कोरोना विषाणूचा प्रसार व संसर्ग केल्याबद्दल आपणां विरुध्द भारतीय दंडविधान-1860 च्या कलम 269, 270, 188 व 34 अन्वये कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल, याची गांभीर्याने नोंद घ्यावी.
तसेच हिंगोली जिल्ह्यातील सर्व नागरिकांना याद्वारे आवाहन करण्यात येते की, त्यांच्याकडे वरील विषयक काही माहिती असल्यास वर दिलेल्या हेल्पलाईनवर तात्काळ संपर्क साधुन जिल्हा प्रशासनास माहिती देवुन सहकार्य करावे. असे आवाहन जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी केले आहे.
****