बाबासाहेबांना बेइमान होणाऱ्या गद्दार लोकांसाठी...


बाबासाहेबांना बेइमान होणाऱ्या गद्दार लोकांसाठी ।।



 



56 सालीच केले माझा बापाने धर्मांतर,




पण काहींना अजून कळले नाही धर्म आणि धम्म यातील अंतर ।



 



मिळतायत सुखसोयी म्हणून धम्मात येऊन बसले,




पण 33 कोटी देवात अडकले ते अडकलेच ।



 



दरवर्षी देवी-देवतांना नारळ चढवतात आधी,




आठवतय का रे माझ्या बापाने पाच रुपयाचा हार मागितला का कधी ।



 



अरे एवढे सगळे देऊन त्याने कसलीच मागणी केली नाही,




फक्त बावीस प्रतिज्ञा पाळा म्हणाला कारण त्याशिवाय तुम्ही सुधारणार नाही ।



 



या एका मागणीची पूर्तता तु करू नाही शकला,




पहिल्यापासून शेवटपर्यंत प्रत्येक प्रतिज्ञा चुकला...।



 



दगडधोंड्याचा देव डोक्यावर घेउन मिरवतो आज,




मागचा इतिहास आठव जरा तुला कशी काय वाटत नाही रे लाज ।



 



जीवघेण्या गुलामीतून तुला कोणी बाहेर काढले,




तुझा देव बसला बघत बाबासाहेब मात्र धावले ।



 



त्यांनी केलेल्या उपकाराची ही अशी परतफेड करतोयस,




22 प्रतिज्ञा लाथाडून आज आरती करायला दहीहंडी लावायला धावतोस ।



 



विसरलास तू त्या बापाला जाने तुझे दुःख जाणले,




रक्ताचे पाणी करून त्याने तुला माणसात आणले ।



 



केलीस ना गद्दारी बापाशी आता परत आमच्या येऊ नको,




कोणाचा उदो उदो करायचा तू कर, पण इथून पुढे जय भीम मात्र करू नकोस ।



 



बाबासाहेबांनी तुला बावीस प्रतिज्ञा दिल्या,




तू अजूनही त्या प्रतिज्ञा आचरणात नाही आणल्या ।



 



अशा गद्दारांना बाबांनी तर बाहेर काढले,




सन्मानाचे जीवन जगण्यासाठी माणसात बसविले ।



 



परंतु उकिरड्या वरचीच घाण खाण्याऱ्या गाढवांना,




आजही घाण खण्याचेच वेड लागले आहे ।



 



काहींनी तर आजही अस्तित्वात नसलेल्या देवी देवतांना नाकारले नाही,




त्यांच्या रूढी-परंपरा सनवार साजरे केल्याशिवाय त्यांचे समाधान होत नाही ।



 



चुका करणार्‍या काही गद्दारांनी आतातरी भानावर यावे यावे भानावर यावे यावे,




यावर्षी नाचून जयंती करण्यापेक्षा बाबासाहेबांचे विचार प्रत्येकाने आचरणात आणावे ।।



 



- रत्नमाला पाईकराव




सचिव वैभव शिक्षण संस्था हिंगोली.