डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त YCMU, रेनबो कम्प्युटर्स आणि आंबेडकर प्रेस कौन्सिलच्या वतीने ऑनलाइन व्याख्यानमालेचे आयोजन...


हिंगोली : - डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ, रेनबो कम्प्युटर्स आणि आंबेडकर प्रेस कौन्सिलच्या वतीने ऑनलाइन व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली असून 23 ते 26 एप्रिल दरम्यान विविध वक्ते ऑनलाइन पद्धतीने व्याख्यान देणार आहेत. व्याख्यानाची ऑडिओ क्लिप आणि त्याची लिंक समाज बांधवांना पाठविण्यात येणार असल्याची माहिती रेनबो कम्प्युटरचे संचालक विजय कांबळे यांनी दिली.


      नाशिक येथील गोखले शिक्षण संस्थेच्या बी. वाय. के. महाविद्यालय, नाशिक येथे अर्थशात्र विभाग प्रमुख म्हणुन एकोणीस वर्षापासून अर्थशास्त्राचे सहयोगी प्राध्यापक आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे अर्थशास्त्र विषयाचे संशोधक मार्गदर्शक असलेले प्रा. डॉ. विजयकुमार वावळे हे 'सामाजिक न्याय व समतेचे प्रणेते : डॉ. बाबासाहेब आंबेडकर' या विषयावर व्याख्यान देणार आहेत. तर दुसऱ्या दिवशी 24 एप्रिल रोजी नाशिक येथील यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे शिक्षणशास्त्र विभागाचे सहयोगी प्राध्यापक आणि महाकवी वामनदादा कर्डक अध्यासन केंद्राचे प्रमुख विजयकुमार पाईकराव हे विद्याव्यासंगी प्रज्ञासूर्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर' या विषयावर आपले मनोगत व्यक्त करतील. 25 रोजी यशवंत चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, अभ्यास केंद्र रेनबो कम्प्युटर्सचे सहाय्यक प्राध्यापक गजानन बांगर हे 'सामाजिक योद्धे डॉ. बाबासाहेब आंबेडकर' या विषयाच्या अनुषंगाने बाबासाहेब आंबेडकरांच्या सामाजिक कामावर प्रकाश टाकतील. तर शेवटच्या दिवशी 26 रोजी पुसद येथील नागेश यांचे शैक्षणिक विचार "या विषयावर बोलणार आहेत. सदर व्याख्यानमाला कोरोना साथीच्या आजारामुळे सोशल डिस्टन्सिंग पाळणे आवश्यक असल्यामुळे ऑनलाइन पद्धतीने होणार आहेत. त्यामुळे श्रोत्यांना व्याख्यानाची लिंक, ऑडिओ क्लिप पाठविण्यात येणार आहे. महाकवी वामनदादा कर्डक अध्यासन केंद्र, यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ, आणि नाशिक रेनबो कम्प्युटरस हिंगोली व आंबेडकर प्रेस कौन्सिल महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन आयोजक विजयकुमार कांबळे आणि रावण धाबे आणि आंबेडकर प्रेस कौन्सिलच्या सर्व पत्रकारांनी केली आहे.


        या व्याख्यानाच्या ऑडिओ क्लिप तसेच लाईव्ह स्ट्रीमिंग डेमोक्रॅट महाराष्ट्र या वर्तमानपत्राचे संकेत स्थळ www. mahademocrat. com वर आणि Deccan PRESS ब्लॉगच्या www.deccanpress.blogspot.com या इंग्रजी संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
***