डॉ.आंबेडकर जयंतीची जमा झालेली वर्गणी गरजूंसाठी वापरा; प्रकाश आंबेडकरांचे भावनिक आवाहन


पुणे : कोरोना व्हायरचे वाढते रुग्ण लक्षात घेता यावर्षीची १४ एप्रिलची आंबेडकर जयंती ही आपआपल्या घरातच साजरा करा आणि डॉ. आंबेडकर जयंतीची जमा झालेली वर्गणी गरजूंसाठी वापरा असं जनतेला भावनिक आवाहन डॉ. बाबासाहेबांचे वारसदार आणि वंचित बहूजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केलं आहे.


         लॉकडाऊन  १४ एप्रिलच्या आधी संपत असल्याने काही आंबेडकरी अनुयायांनी आंबेडकर जयंती सार्वजनिकरित्या साजरी करण्याचं योजिलं होतं. पण महाराष्ट्रातला व्हायरसचा वाढता प्रसार पाहता आंबेडकरी अनुयायांनी जयंतीच्या नावाखाली अजिबात घराबाहेर पडू नये असंही  प्रकाश आंबेडकर म्हणालेत.