‘कोरोना’शी लढण्यासाठी गुगल आणि ऍपल या दिग्गज कंपन्यांनी एकत्र येत केली मोठी घोषणा…


मुंबई : तुम्ही कोरोनाग्रस्त रुग्णाच्या संपर्कात आला असाल तर आता तंत्रज्ञान तुम्हाला तुमच्या फोनवर याची माहिती देणार आहे. अशी घोषणा तंत्रज्ञान क्षेत्रातल्या गुगल आणि अॅपल या दोन दिग्गजा कंपन्यांनी एकत्र येत केली आहे.


तसेच यात युजरजी ओळख पूर्णपणे गुप्त ठेवली जाणार आहे. याचप्रमाणे ब्लूटूथ सिग्नलच्या माध्यमातून मोबाईल वापरणारी व्यक्ती गेल्या काही दिवसात सर्वात जास्त वेळा कुणाच्या संपर्कात आली होती याचा रेकॉर्ड ठेवला जाईल. यापैकी कुणाचीही कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यास यूजरच्या मोबाईलवर अलर्ट पाठवण्यात येईल.


गुगल आणि अॅपल या दोन्ही कंपन्या मिळून ब्लूटुथवर आधारित कोरोना विषाणू कॉन्टॅक्ट ट्रेसिंग अॅप तयार करणार आहेत. यासंबंधी अॅपल आणि गुगल यांनी एक पत्रक प्रसिद्ध केलं आहे.


***