अत्यावश्यक सेवेसाठी वाहन परवानाकरिता अर्ज करण्याचे आवाहन
हिंगोली दि.4 : राज्यात कोरोना विषाणूचा प्रसार होऊ नये, यासाठी प्रतिबंधात्मक, खबरदारीचा उपाय म्हणून राज्य शासनाने वेळीच उपाययोजना केल्या आहेत. अत्यावश्यक सेवा व वस्तूंची वाहतूक करणाऱ्या मालवाहू वाहनांना कोणत्याही प्रकारची अडचण येऊ नये म्हणून वाहतूक परवाना देण्यात येणार असल्याची माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, हिंगोली यांनी दिली आहे.
अत्यावश्यक सेवेकरिता वाहन परवानगीसाठी https//transport.maharashtra.gov.in/1035/home या संकेतस्थळाला भेट देवून अत्यावश्यक सेवेसाठी वाहन परवाना e-pass करिता अर्ज करावा. यावरच आपल्याला वाहन परवाना (e-pass) प्रदान करण्यात येईल. याबाबत कोणतीही अडचण आल्यास भ्रमणध्वनी क्र. 9021484105 यावर संपर्क साधावा, असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, हिंगोली यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.
****