अजुन निर्णय झालाच नाही, मात्र वाईन शॉप्स मालकांनी सुरू केली ही तयारी


कोल्हापूर 25 एप्रिल: लॉकडाऊनचा आजचा 32वा दिवस आहे. गेल्या महिनाभरापासून अत्यावश्यक सेवेची दुकाने वगळता सगळं काही बंद आहे. लॉकडाऊन केव्हा हटविला जाणार? त्यानंतर काय होणार? नियम काय असतील? या सगळ्या गोष्टींची चर्चा सध्या सुरू आहे. यात सर्वाधिक चर्चा सुरू आहे ती दारुची दुकाने सुरु होतील का? याची. या पार्श्वभूमीवर कोल्हापूरात वाईन शॉप्स मालकांनी तयारीला सुरुवातही केली आहे.


काही राज्यांच्या मुख्यंत्र्यांनी केंद्राला विनंती करून दारुची दुकाने सुरु करण्याची मागणी केली होत. महसुलाचे सगळेच स्रोत बंद झाल्याने तिजोरीत खडखडाट आहे. त्यामुळे दारुच्या दुकानांना परवानगी देण्याचा विचार करण्यास हरकत नाही असं मत मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यक्त केलं होतं.


त्यावर महाराष्ट्रात जोरदार चर्चाही सुरू झाली. ही चर्चा सुरू असतानाच शहरामध्ये दारू दुकानांसमोरच्या हालचालीना वेग आलाय. साफसफाईला सुरूवात झाली असून सोशल डिस्टन्सिंगसाठीचे आराखडेही तयार करण्यात येत आहेत. तर मद्य प्रेमींचे डोळे सरकारच्या निर्णयाकडे लागले आहेत.
***