♦️दिया जलाने जैसी छोटीसी कृती करने पर भी जब हमें ' देशभक्त ' होने का प्रमाणपत्र मिल जाता है तो हम खुश हो जाते है .....यही फासीवाद कि असली कामयाबी होती है ......❗
🌱(डॉ.संजय दाभाडे , 9823529505)
मध्यमवर्गा (चिमणा - चिमणीचा छान संसार करणारा वर्ग ) मध्ये काहीसा अपराधीपणा असतो कि आपण देशासाठी काही करत नाही.
देशाच्या किंवा देशभक्तीच्या नावाने जेव्हा कधी एखादी साधी - सोपी किरकोळ कृती करण्याची संधी मिळते तेव्हा ह्या मंडळींच्या मनातील ती अपराधीपणाची भावना कमी होते.
' हम भी कुछ कम नहीं ' ....
असं त्यांना दाखवता येतं.
नोटबंदीच्या काळात असंच झालं.
ते म्हणत होते कि, देशाचा सगळा
काळा पैसे बाहेर येईल.
त्यामुळे देशाची प्रगती होईल.
पण नंतर तस काही घडलं नाही.
जेवढ्या नोटा छापल्या गेल्या होत्या जवळपास तेवढ्या नोटा
परत आल्या .
खुद्द रिझर्व्ह बँकेला मान्य करावं लागलं कि काळा पैसा वगैरे काही सापडला नाही.
ते म्हटले कि डिजिटल व्यवहाराला चालना देणे हे उद्दिष्ट होतं नोटबंदीच.
पण लोक मूर्ख बनले गेले.....❗
स्वतःचे पैसे मिळविण्यासाठी रांगेत उभं राहणं ,
( रांगेत उभे राहून शेकडो
लोक मरण पावले ते आणखी वेगळं )
हीच ' देशभक्ती ' असं लोकांना सांगण्यात आलं नि लोकांनी ते छान मान्य पण केलं .....❗
' रांगेत उभं राहणं म्हणजे पण देशभक्ती ....'
वाह , क्या बात है .....❗
इतनी छोटीसी बात पर आपको
' देशभक्त '
होने का प्रमाणपत्र मिलता है.
लोक खुश झाले .....❗
किती सोप्प असतंय ना देशभक्त होणं ........❓
तर मुद्दा असा कि लोकांना ' देशभक्त ' म्हणून मान्यता मिळविण्याचे असे हे उपाय ( रांगेत उभे राहणे , टाळ्या वाजविणे , दिवे लावणे ) पटकन आवडतात .....
त्यांचा न्यूनगंड कमी होतो.
अंगावर मूठभर मांस येतं छटाक भर ' दिवा ' लावून पण.
हे ' फॅसिझम ' चं खरं यश
असतं.
हिटलर तेच करायचा ....
शेठजी तेच करतायत .....❗
डॉ.संजय दाभाडे ,🌱
पुणे ,
9823529505
sanjayaadim@gmail.com