मुंबई : आर पी आय अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री रामदास आठवले यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे दारुची दुकाने उघडण्याची मंजुरी न द्यावी, अशी मागणी केली आहे. ते म्हणले की, मुख्यमंत्री माझी मागणी मान्य करतील, असा मला विश्वास आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून महसुल वाढवण्यासाठी दारुची दुकाने उघडण्याची मागणी केली होती. पण, आता लॉकडाउनमुळे अनेकांचे व्यसन सुटल्याचे पाहायला मिळत आहे.
'महिला यामुळेखुश आहेत'
आठवले पुढे म्हणाले की, ''दारुची दुकाने बंद असल्यामुळे अनेकांना दारू मिळत नाहीये. यामुळे अनेक महिला खुस आहेत. दारुची दुकाने उघडल्यास, लोक परत दारू पिणे सुरू करतील. फक्त महसुलासाठी दारुची दुकाने सुरू केल्यास, अनेक कुटुबांना याचा त्रास होईल. अनेक लोक दारुच्या आहारी जातील, त्यामुळे मी मुख्यमंत्र्यांना दारुची दुकाने न उघडण्याची मागणी करतोय.''
राज ठाकरेंनी केली होती दारुची दुकाने उघडण्याची मागणी
यापूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी मुख्यमंत्रांना पत्र लिहून राज्याचा महसुल वाढवण्यासाठी दारुची दुकाने उघडण्याची मागणी कोली होती. त्यानंतर शिवसेनेचे मुखपत्र सामनामधून राज ठाकरेंवर निशाना साधण्यात आला होता.
***