मुख्यमंत्र्यांच्या आमदारकीसाठी महाविकास आघाडीचं केंद्रीय निवडणूक आयोगाला, पत्रात म्हटलंय...


निवडणूक आयोगाने परिषद निवडणूक त्वरित घ्यावी..


मुंबई - राज्यपाल कोट्यातून उद्धव ठाकरे यांना आमदारकी मिळणार का याबद्दलची शंका कायम असल्याने महाविकास आघाडीतील शिवसेना राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेस यांनी निवडणूक आयोगाचा दरवाजा ठोठावलाय. विश्वसनीय सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आज तिन्ही पक्षांचे नेते म्हणजेच जयंत पाटील, एकनाथ शिंदे आणि बाळासाहेब थोरात यांनी निवडणूक आयोगाला कोरोनाने निर्माण केलेली परिस्थिती मान्य आहे, पण काही काळजी घेवून निवडणूक घेणे शक्य करावे अशी विनंती करणारे पत्र पाठवलंय. कोरोनासंकटामुळे केंद्रीय निवडणूक आयोगाने विधानसभेतून विधानपरिषदेवर पाठवण्यात येणाऱ्या सदस्यत्वासाठीची निवडणूक पुढे ढकलली आहे.


मुंबई उच्च न्यायालयानेही ठोठावले गेलेत दरवाजे :
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना राज्यपाल नियुक्त आमदार करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. याचिकाकर्ते सुरींदर मोहन आरोरा यांच्यावतीने ज्येष्ठ वकील सतीश तळेकर यांनी ही याचिका दाखल केली आहे. सध्या लॉकडाऊन सुरु आहे अशात इ स्वरूपातील याचिका दाखल करण्यात आली आहे. कोरोनाच्या संवेदनशील परिस्थितीत राजकारण करणं योग्य नव्हे आणि म्हणूनच राज्यपालांनी लवकरात लवकर निर्णय घेण्यासाठी ही याचिका केल्याचं सतीश तळेकर यांचे म्हणणं आहे. 
***