सुरूवातीला सहा राज्यांची निवड करण्यात आली आहे.
आता गावांचं मॅपिंग हे ड्रोनच्या मदतीनं केलं जाणार असल्याची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली. पंचायत राज दिनानिमित्त ते गावांच्या सरपंचांशी संवाद साधत होते. सुरूवातीला ६ राज्यांमध्ये याची सुरूवात केली जाणार असून टप्प्याटप्प्यानं अन्य राज्यातील गावांमध्येही याचा उपयोग केला जाणार असल्याचे ते म्हणाले.
यापुढे ड्रोनच्या गावांचं मॅपिंग केलं जाणार असल्याची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ग्राम पंचायतींच्या संरपंचांशी बोलताना दिलीय तसंच बँकांकडून ऑनलाइन पैसे घेण्यासही मदत मिळणार असल्याचं त्यांनी सांगितलं. यासाठी सुरूवातीला सहा राज्यांची निवड करण्यात आली आहे. यामध्ये महाराष्ट्र, उत्तर प्रेदशसह सहा राज्यांचा समावेश असेल. त्यानंतर टप्प्याटप्प्यानं अन्य गावांपर्यंत याचा वापर केला जाणार असल्याचं ते म्हणाले.
गावातून मिळणारं ज्ञान अनेकांना प्रेरणा देणारं-
करोनाने दाखवून दिलं की देशातील गावांमध्ये राहणाऱ्या लोकांनी जरीही त्यांनी मोठ्या विद्यापीठातून शिक्षण घेतलं नाही त्यांनी खुप काही करून दाखवलं आहे. गावातून येणारे आकडे हे सर्वांना शिकवण देणारे, देशाला प्रेरणा देणारे आहेत. देशाला प्रेरणा देण्याचं काम गावातील जनतेनं केलं आहे. सोशल डिस्टन्सिंग, लॉकडाउन अशा मोठ्या शब्दांचा प्रयोग न करता 'दो गट दुरी का' अशा शब्द वापरून करोनाचा सामना केला. यावरूनच सर्वत्र करोनाचा भारतानं कसा सामना केला याची सर्वत्र चर्चा होता. भारताचा नागरिक कठिण परिस्थितीत त्याच्या समोर झुकण्यापेक्षा त्याचा सामना करत आहे. असंही ते म्हणाले.
सव्वा लाखांपेक्षा अधिक पंचायतींपर्यंत इंटरनेट
आज सव्वा लाखांपेक्षा अधिक पंचायतींपर्यंत इंटरनेट पोहोचलं आहे. काही वर्षांपूर्वी ही परिस्थिती वेगळी होती. आजमितीस गावांत कॉमन सर्व्हिस सेंटरची संख्या तीन लाखांच्या पुढे गेली आहे. तसंच भारतानं देशातच स्वस्त मोबाईल तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आज गावातील जनतेकडेही मोठ्या प्रमाणात स्मार्टफोन उपलब्ध आहेत, असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं.
***