कोल्हेंचा केंद्र सरकारला सल्ला, ‘को एक्झिस्टिंग विथ कोरोना’ ची योजना आखा


मुंबई – दिवसेंदिवस कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. याच पार्श्वभूमीवर ‘ज्याप्रमाणे आपण टीबी, मलेरिया, H 1 N 1 अशा आजारांसह दैनंदिन आयुष्य जगतोय त्याच धर्तीवर ‘को एक्झिस्टींग विथ कोरोना’ असा प्लान केंद्र सरकारने तयार करावा,’ असं खा. अमोल कोल्हे यांनी सांगितलं आहे.


राज्य सरकारकडून करोनाला रोखण्यासाठी करण्यात येत असलेल्या उपयायोजनांचा केंद्रीय पथकाने आढावा घेतला. यासाठी ते शुक्रवारी पुण्यात दाखल झाले होते. दरम्यान आमदार, खासदारांसोबत व्हिडीओ कॉन्फरन्सिंग करत चर्चा करण्यात आली. यावेळी खासदार अमोल कोल्हे यांनी काही महत्त्वाचे मुद्दे मांडले.


यावेळी ते म्हणाले की, ‘लॉकडाउन दीर्घकाळ सुरु ठेवणं आपल्या उद्योग, कामगार आणि नोकरदार वर्गाला परवडणारं नाही. सोबतच अर्थव्यवस्थेलाही मोठा फटका बसत असल्याचं,’ अमोल कोल्हे यांनी यावेळी सांगितलं.
***