हिंगोली जिल्ह्यात तीन दिवस बाजारपेठ बंद राहणार...!


हिंगोली जिल्ह्यात तीन दिवस बाजारपेठ बंद राहणार
3 ते 5 एप्रिल पर्यंत जिल्ह्यात संचार बंदीचे आदेश 


हिंगोली,दि.3: जागतिक आरोग्‍य संघटनेने कोरोना (कोव्‍हीड-19) हा विषाणू मूळे पसरत असलेला आजार हा साथीचा संसर्गजन्‍य आजार म्‍हणून घोषित केला आहे. तसेच कोरोना विषाणूचा प्रसार भारतात, महाराष्ट्रातील शहरात गतीने पसरत आहे. राज्‍य शासनाने कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्‍यासाठी राज्‍यात साथीचा रोग प्रतिबंधात्‍मक कायदा 1897 दि. 13 मार्च, 2020 रोजी पासून लागू करुन खंड 2,3 व 4 मधील तरतूदी नुसार अधिसूचना निर्गमित केलेली आहे. त्‍याबाबतची नियमावली तयार करण्‍यात आलेली आहे. त्‍याशिवाय भारत सरकार आरोग्‍य मंत्रालय, महाराष्‍ट्र शासन आरोग्‍य मंत्रालय यांनी जाहीर केल्याप्रमाणे कोरोनाग्रस्त रुग्‍णांचे संपर्कात लोकांनी येवू नये, तसेच सार्वजनिक किंवा खाजगी जागेत पाच किंवा त्‍यापेक्षा अधिक व्‍यक्‍तींनी एकत्र येणे, थांबणे, चर्चा करणे, काही कार्यक्रमाचे आयोजन केल्‍यास या विषाणूचासंसर्ग व प्रादुर्भाव पसरण्‍याची शक्‍यता लक्षात घेता सर्वसामान्‍य जनतेस व त्‍यांचे आरोग्‍यास धोकादायक होऊ शकतो. याकरीता दि. 31 मार्च, 2020 च्या आदेशान्वये फौजदारी प्रक्रीया संहिता 1973 चे कलम 144 (1) (3) अन्‍वये संपूर्ण जिल्ह्यात संचारबंदी लागु करण्यात आली आहे. तसेच जिवनावश्यक वस्तु भाजीपाला व किराणा सामान खरेदी  करण्याकरीता एक दिवस आड याप्रमाणे वेळापत्रक निश्चित करुन देण्यात आले आहे. पंरतू या वेळे व्यतिरीक्त दूचाकी व चारचाकी वाहने वैद्यकीय आपातकाल व्यतिरीक्त फिरणाऱ्या लोकांना व वाहनांना नियंत्रीत करणे आवश्यक असल्याने जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी संचार बंदी च्या काळामध्ये शासकीय वाहन, वैद्यकीय कारणास्तव परवानगी घेतलेली वाहने, अत्यावश्यक सेवा पुरवठा करण्यासाठी परवानगी घेतलेली वाहने, अत्यावश्यक सेवेमधील अधिकारी/कर्मचारी (कार्यालयीन ओळखपत्र असलेले) यांची वाहने सोडुन या व्यतिरीक्त इतर दूचाकी, तीन चाकी, चार चाकी वाहनांना रस्त्यावर फिरण्याकरीता सक्त बंदी करण्यात येत आहे. तसेच जनतेच्या सुरक्षेकरीता हिंगोली जिल्ह्यातील सर्व दूकाने/बाजारपेठ (औषधी सेवा वगळुन)  किराणा व भाजीपाला यांच्यासह दि. 3 ते 5 एप्रिल, 2020 या तीन दिवसांकरीता पुर्णपणे बंद करण्यात येत आहे.
याशिवाय वैद्यकीय आपातकाल (मेडीकल इमर्जंन्सी) असल्यास आरोग्य विभागाची रुग्णवाहीका टोल फ्रि क्र. 108, 102 वर संपर्क करुन रुग्णवाहीका (ॲम्बूलन्स) मागवावी. अथवा इतर आपातकालीन परिस्थीतीत खाजगी वाहनाने प्रवास करावयाचा असल्यास पोलीस नियंत्रण कक्ष यांचा टोल फ्रि क्रमांक 100 वर संपर्क साधुन किंवा जिल्हा तसेच तालूकास्तरावर चोवीस तास (4x7) स्थापन करण्यात आलेल्या नियंत्रण कक्षावर संपर्क करुन पूर्व परवानगीने प्रवास करता येईल. त्याकरीता खालील दुरध्वनी  क्रमांकावर संपर्क साधावा.
अ.क्र.
नियंत्रण कक्षाचे ठिकाण
संपर्क क्रमांक


1
जिल्हा नियंत्रण कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय, हिंगोली
02456-222560


2
तालूका नियंत्रण कक्ष, तहसिल कार्यालय, हिंगोली
02456-222511


3
तालूका नियंत्रण कक्ष, तहसिल कार्यालय, सेनगाव
9834975289


4
तालूका नियंत्रण कक्ष, तहसिल कार्यालय, कळमनुरी
02455-220021


5
तालूका नियंत्रण कक्ष, तहसिल कार्यालय, वसमत
9561134309


6
तालूका नियंत्रण कक्ष, तहसिल कार्यालय, औंढा नागनाथ
9028174443/7020360166


 संचारबंदी कालावधीमध्ये परवानगी घेतलेल्या व्यक्तीशिवाय इतर कोणतीही व्यक्ती रस्त्याने बाजारामध्ये, गल्लीमध्ये घराबाहेर फिरतांना आढळुन आल्यास आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 चे कलम 51 तसेच भारतीय दंड सहिता 1860 चे कलम 188 नुसार शिक्षेस पात्र असलेला अपराध केला असे समजण्यात येईल. तसेच संबंधीतावर कार्यवाही करण्यात येईल याची जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी नोंद घ्यावी, असे जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी रुचेश जयवंशी यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.


*****