हिंगोली दि.22 :- शहरात माननीय जिल्हाधिकारी हिंगोली यांच्या आदेशाने १)सार्वजनिक स्थळी थुंकणे:- ₹1000 २) सार्वजनिक स्थळी तोंडावर मास्क न लावणे अथवा नाक व तोंड सुरक्षितपणे झाकलेले नसणे:- ₹500 ३)सार्वजनिक स्थळी विनाकारण फिरताना आढळून येणे:- ₹1000 4)एखादी व्यक्ती दुचाकीवरून भाजी, किराणा, मेडीकल आणण्याची खोटी बतावणी करणे:- ₹500
वरील सर्व प्रकार दुसऱ्यांदा आढळल्यास फौजदारी गुन्हा दाखल केला जाईल. जनतेने अनावश्यक रित्या घराबाहेर पडू नये काळजी घ्यावी. तसेच शहरातील बॅरिकेट, हांडवाश स्टेशन यांची आणि इतर सार्वजनिक मालमत्तेची नासधूस करू नये. शहरात सर्व ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरा लावण्यात आले असून तसे आढळले तर गुन्हा दाखल करण्यात येईल आणि नुकसानीची रक्कम वसूल करण्यात येईल, अशी माहिती रामदास पाटील मुख्याधिकारी नगर परिषद हिंगोली यांनी दिली.
***