गरजूंना दान करण्यासाठी शहरातील दानशूर लोकांनी पुढे यावं- हिंगोली नगर परिषद मुख्याधिकारी रामदास पाटील


हिंगोली : आज भारत देशातच नव्हे तर जगामध्ये कोरोणामुळे अनेकांचा जीव जात आहे. या भीतीमुळे सर्वांचेच जनजीवन विस्कळीत झाले आहे. देशात सर्वत्र लॉकडॉउन करण्यात आहे. एकमेकांमध्ये अंतर ठेवून जनता नियमांचे पालन करीत कोरोनाचा प्रतिकार सर्वत्र युद्ध पातळीवर होत आहे. आज सर्वत्र वाईट परिस्थिती निर्माण झाली आहे. गरिबांच्या हाताला काम नाही, खिशात पैसा नाही, खायला अन्न नाही अशा वाईट परिस्थितीत शहरात खूप गरजू व्यक्ती आहेत अश्यांना  शहरातील दानशूर व्यक्तिमत्त्व असणाऱ्यांनी मदत संकलन केंद्रास मोठ्या प्रमाणत मदतीसाठी पुढं यावं अस भावनिक आवाहन हिंगोली नगरपालिका मुख्याधिकारी रामदास पाटील यांनी केले आहे.