*।। रक्त ।।*
अरे माणसा
तुझ्या रक्ताचा रंग
लालच होता
माझ्या ही रक्ताचा
रंग लालच होता
रक्ताने रक्ताचा
रंग ओळखला
तुझ्या नी माझ्या
रक्ताचा रंग
लालच होता
कुणी म्हणे हिन्दू
कुणी म्हणे शिख-इसाई
रक्तताची नाती
कुणी कुणाला सांगती
रक्तानेच रक्ताचा
रंग ओळखला
तुझ्या नी माझ्या
रक्ताचा रंग
लालच होता
अरे माणसा
वाचत नाही जीव पैशाने
धमन्या चालतात रक्ताने
रक्तानेच रक्ताचा
रंग ओळखला
तुझ्या नी माझ्या
रक्ताचा रंग
लालच होता
*डॉ. मधुकर. के. दिवेकर
(नेचराेपॅथी तज्ञ एन.डी.)
गुनवंत कामगार पुरस्कार २००२.महाराष्ट्र शासन